केजीएफ चित्रपटातील हा अभिनेता देत आहे मृत्यूशी झुंज; डॉक्टर म्हणाले कोणत्याही क्षणी…

नवी दिल्ली | दक्षिणात्य चित्रपटांची बात काही औरच आहे. या चित्रपटांमधील कथा आणि गाणी यामुळे टॉलीवूड आता बॉलीवूडला देखील टक्कर देत आहे. काही दिवसांपूर्वी केजीएफ हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट प्रचंड गाजला. यश या अभिनेत्याने चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका बजावली होती.

 

या चित्रपटामध्ये खासीम चाचा ही भूमिका अभिनेते हरीश रॉय यांनी साकारली. त्यांनी या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिला. मात्र आता हरीश त्यांना झालेल्या कॅन्सरच्या आजारामुळे प्रचंड त्रस्त आहेत. सध्या ते या आजाराच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचले आहेत. या आजारावर उपचारांसाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत. एका यूट्यूब चैनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपली व्यथा मांडली आहे.

 

आपल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की, ” ‘केजीएफ चाप्टर २’ हा चित्रपट रिलीज होण्याची मी फार प्रतीक्षा केली. गेल्या तीन वर्षांपासून मी कॅन्सरशी झुंज देत आहे. या आजाराने मला पूर्णतः ग्रासले आहे. सध्या माझ्याकडे याच्यासाठी उपचार घेण्याकरिता पैसे नाहीत.

 

मी फार आर्थिक विवंचनेत अडकलो आहे. त्यामुळेच मी गेल्या तीन वर्षांपासून मला कॅन्सर आहे हे कुणाला कळून दिले नाही. कारण मला पैशांची नितांत गरज होती. केजीएफ या चित्रपटामधून मला थोडेफार पैसे मिळालेले आहेत. सुरुवातीला माझ्या गळ्याला थायरॉईड झाला होता. आता त्याचे रूपांतर कॅन्सर मध्ये झाले आहे. यामुळे माझी प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे.”

 

आपल्या मुलाखतीमध्ये पुढे त्यांनी सांगितले की, ” केजीएफ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मला फार त्रास होत होता. मात्र यावेळी मी माझ्या चेहऱ्यावर मोठी दाढी वाढवली होती. कारण या आजाराने माझ्या चेहऱ्यावर सूज येत होती. हे सर्व लपवण्यासाठीच मी माझ्या चेहऱ्यावर दाढी वाढवली होती. मी या आजाराच्या चौथ्या स्टेजवर पोहोचलो आहे.

 

या आजारापासून मी कधीच मुक्त होऊ शकत नाही. आपल्या आयुष्यामध्ये एक गोष्ट अशी असते जी आपल्याला मोठ्या प्रसिद्धीस होतात नेते नाही तर माती मोल करते. ” असे देखील ते मुलाखतीमध्ये म्हणाले. हरीश रॉय यांनी आपल्या परिस्थितीचा एक व्हिडिओ शूट केला होता ज्यामध्ये त्यांनी चाहत्यांकडे मदत मागितली होती. मात्र हा व्हिडीओ ते कधीच पोस्ट करू शकले नाहीत.

 

हरीश यांनी साउथ इंडियन चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जादूने प्रचंड लोकप्रियता कमावली आहे. केजीएफ या चित्रपटाच्या दोन्हीही पार्टमध्ये त्यांनी दमदार अभिनय केला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १२०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. धन धना धन, बेंगलोर अंडरवर्ल्ड यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांचा अभिनय पाहायला मिळाला आहे. चित्रपटसृष्टीत 25 वर्षाहून अधिक त्यांचे कारकीर्द झालेली आहे. त्यांच्या तब्येतीसाठी आता चाहते चिंता व्यक्त करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button