आत्ताच्या घडामोडी

टीम इंडिया मधून संधी मिळाली नाही, म्हणून देश सोडून दुसऱ्या संघातून खेळणार हा प्रसिध्द क्रिकेटर

दिल्ली | सध्या टीम इंडिया आणि इंग्लंड वनडे सामने सुरू आहेत. दिवसेंदिवस या सामन्यात रोमांच वाढत चालला आहे. या सामन्या दरम्यान अनेक युवा खेळाडूंना संधी मिळत आहे. त्यामुळे युवा खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये बघितलेले स्वप्न देखील पूर्ण होत आहे.

 

मात्र या दरम्यान भारतातील एका प्रसिद्ध खेळाडूने देश सोडून इतर देशातील क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट प्रेमींना हा मोठा धक्का मानला जात आहे. सदर खेळाडूला इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात संधी मिळाली नाही.

 

त्यामुळे तो देश सोडून इतर देशांमधील टीम मध्ये खेळून नशीब आजमावणार आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून नवदीप सैनी आहे. नवदीप हा वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. भारतीय युवा खेळाडूं मधील तो एक क्रेझ आहे.

 

मात्र त्याने काउंटी क्रिकेट खेळायचे ठरवले आहे. तो यावर्षी काउंटी चॅम्पयनशिपमध्ये खेळणार आहे. त्यासाठी त्याला मोठी संधी मिळाली आहे. तसेच तो हे क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे त्याने स्वतः म्हटले आहे. केंट मध्ये माझे १०० टक्के देण्यासाठी मी प्रयत्न करेल असे त्याने म्हटले आहे.

 

काउंटी चॅम्पयनशिप आणि रॉयल लंडन कप मधील तो ५ सामन्यात दिसणार आहे. त्यामुळे सध्या तो उत्कृष्ट प्रशिक्षण घेत आहे. त्याला ही मोठी संधी मिळाली आहे. त्यामुळे तो देशाचे नाव मोठं करेल अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button