कोट्यावधींची संपत्ती आणि ऐश आराम जिंदगी सोडून या प्रसिध्द अभिनेत्रीने घेतलाय संन्यास

दिल्ली | अनेक दिग्गज कलाकार अभिनय क्षेत्रात येतात, प्रकाश झोतात येतात अनेक चित्रपटांमध्ये काम करतात आणि मग अभिनय क्षेत्राला कायमचा अलविदा करून वेगळा मार्ग निवडतात. मात्र त्यांनी केलेल्या अभिनयाची आठवण प्रेक्षकांना कायम होत असते. अशे अनेक दिग्गज कलाकारांनी आपला मार्ग बदलला आहे.
काहींनी तर छोटे छोटे व्यवसाय करून पुढील काळ करण्याचं ठरवलं आहे. काही काळी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकून अवघ्या काही दिवसात प्रकाश झोतात आलेल्या एका दिग्गज अभिनेत्री बाबत आज माहिती पाहणार आहोत. लाखोंची संपत्ति आणि ऐश आराम जिंदगी सोडून सदर अभिनेत्रीने संन्यास घेतला आहे.
सध्या सोशल मीडियावर या अभिनेत्रीची तुफान चर्चा होऊ लागली आहे. अभिनेत्रीचा एक व्हिडिओ Instagram वर व्हायरल झाला आहे. त्यामुळे सध्या तिची तुफान चर्चा सुरू झाली आहे. या अभिनेत्रीचे नाव नुपूर अ लंकार असे आहे. काही वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रातील ती खूप प्रसिध्द अभिनेत्री होती.
मात्र सध्या तिने अध्यात्माचा रस्ता पकडला आहे. आणि तिने संन्यास घेऊन, ऐश आराम जिंदगी सोडून भक्ती मार्गाची जिंदगी जगत आहे. नुपूर ने सुरुवतीच्या काळात छोट्या पडद्यावर काम केले त्यानतंर तिने काही चित्रपटात देखील भूमिका साकारली आहे.
नुपूर ने तिच्या पतीच्या आणि सासूच्या परवानगी नंतर संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आणि अखेर तिने संन्यास घेऊन भक्तिमार्ग अवलंबला आहे. तिची कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. तिने मुंबई मधील तिचा फ्लॅट देखील भाड्याने दिल्याची माहिती समोर आली आहे.