या अभिनेत्रीच्या वाढदिवसा दिवशीच वडिलांचं झाल निधन..

मुंबई | ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी महिला सहभागी झाल्या आहेत. या शोमध्ये नुकतीच माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत शेफाली ही भूमिका करणारी अभिनेत्री काजल काटे ही देखील सहभागी झाली होती. यावेळेस काजल काटे हिने आपल्या करिअरच्या सुरुवातीला झालेल्या घटनेबद्दल माहिती दिली. तिने आपल्या वडिलांच्या निधनाबाबत माहिती दिली.

Join WhatsApp Group

 

काजल काटे हिने बोलताना माहिती दिली की, आई-वडिलांच्या निधनानंतर मग झी मराठीचा ‘माझी तुझी रेशीम गाठ’ हा प्रोजेक्ट मिळाला. ऑडिशन दिली. परत परत ऑडिशन देऊन इतक्या सगळ्या दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. हे सगळं घडलं आई-बाबांच्या आशीर्वादामुळे.

 

या पुरस्काराचे श्रेय जेवढे माझ्या आई-बाबांना जातं तेवढच माझ्या सगळ्या सर्व कलाकारांना देखील जाते, अशी भाऊक पोस्ट तिने‌ केली होती. नुकताच झी गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. अशावेळी तिला सर्वोत्कृष्ट विनोदी स्त्री व्यक्तिरेखा म्हणून पुरस्कार मिळाला होता.

 

काय म्हणाली अभिनेत्री काजल :
बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर काजल काटे हिने आपल्या आई-वडिलांच्या आठवणींना उजाळा.
काजल म्हणते, माझे आई-बाबा 2021 एप्रिल महिन्यात कोरोनाच्या भयंकर लाटेत मला आणि माझ्या बहिणीला एका क्षणात सोडून गेले.

 

काजलच्या वाढदिवसा दिवशी तिच्या वडिलांचं झालं निधन:
त्यावेळेस माझ्या आई-वडिलांना एकदम कोरोना झाला. त्यांना कोरोना झाला हे समजलेच नाही. त्यांना वाटले की, सर्दी खोकल्याचा त्रास आहे. आधी वडील गेले त्यानंतर पंधरा दिवसांनी आई गेली. वडिलांचा ज्या दिवशी वाढदिवस होता, त्याच दिवशी त्यांचे निधन झाले होते. त्याच्या पंधरा दिवसानंतर मला माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेच्या ऑडिशनसाठी बोलवण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button