एक चूक झाली आणि चिमुकल्याचे झाले निधन, वाचून डोळ्यात पाणी येईल

पुणे | रस्त्यावरील खड्डे आणि चिखलामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. सरकार याकडे लक्ष देत नाही म्हणून जनता संताप केली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्ष मुळे अनेक निष्पाप नागरिकांचे जीव जात आहेत. रस्त्यावरील असलेल्या चिखलामुळे एका निष्पाप लहान मुलाचा बळी गेल्याची घटना संभाजी नगर जिल्ह्यात घडली आहे. लहान मुलांच्या पोटात दुखत असल्यामुळे त्याला त्याचे वडील हॉस्पिटलमध्ये मोटरसायकल वरून घेऊन जात असताना चिखलात त्यांची मोटरसायकल फसली. त्यामुळे दवाखान्यात जाण्यासाठी उशीर झाला. योग्यवेळी उपचार न भेटल्यामुळे या चिमुकलेचा मृत्यू रस्त्यातच झाला.

 

या घटनेमध्ये बळी पडलेल्या मुलाचे नाव कृष्णा बाबुलाल परदेशी असे आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील लखमापूर या गावी ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद शहराचे नाव हे संभाजीनगर सत्ताधारी नेत्यांनी यांनी केली आहे. त्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारने देखील या निर्णयाचे स्वागत करून संभाजीनगर हे नाव स्थापन केले. औरंगाबाद शहराचे नाव तरी बदलले असले तरी तेथील जनतेच्या समस्या तसेच अजूनही कायम राहिलेले आहेत.

Advertisement

 

मिळालेल्या माहितीनुसार लखमापूर मध्ये येथे राहणाऱ्या आठ वर्षे कृष्णा परदेशी याला पोटात दुखू लागल्यामुळे त्याचे वडील गाडीवरून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते. मात्र जात असताना रस्ता खराब होता तसेच रस्त्यावर खड्ड्यांमध्ये चिखल सुद्धा मोठ्या प्रमाणात साचला होता. त्यामुळे त्यांची गाडी अर्ध्या रस्त्यांमध्येच फसली गेली. मोटरसायकल खड्ड्यांमध्ये असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी खूप उशीर झाला.

Advertisement

 

उपचार करण्यासाठी उशीर झाल्यामुळे चिमुकल्याचा वडिलांच्या डोळ्यादेखत जीव गेला. या घटनेमुळे संपूर्ण गावात राजकीय यंत्रणे विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. संपूर्ण परिसरात मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात होती. या घटनेचा पुढील तपास एक पोलीस प्रशासन करत आहे. अधिक माहिती पूर्ण माहिती मिळाल्यानंतर देऊ असे पोलीस सूत्रांनी सांगितले

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *