गोव्याला फिरायला गेलेली तरुणी परत आलीच नाही; कारण वाचून डोळ्यात पाणी येईल

मुंबई | गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या कारणामुळे तरुण – तरुणीचे मृत्यू होताना दिसून येत आहे. अशीच एक घटना गोव्याहून मुंबई ला येत असताना घडली. तरुणीचा चा बसमध्येच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. गोवा या ठिकाणी राहत असणाऱ्या तरुणीचा मुंबई कडे येत असताना प्रवास करत असतानाच खाजगी बसमध्येच आकस्मित मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत मृत पावलेल्या तरुणीचे नाव तमिना असे आहे तमिना ही 22 वर्षांची होती.

 

आपला मित्र सचिन किट्टू सोबत तमीना मुंबईला येत होती. तीन दिवसांअगोदर या तरुणीचा गोवा येथे स्कुटी चालवत असताना अपघात झाला होता. या घटनेत तमिनाच्या खांद्यावरती जखम झाली होती. तमिनावर पुढील उपचार करण्यासाठी तमिनाला तिच्या आईने मुंबईमध्ये बोलावले होते. उपचार करण्यासाठी ती गोव्यावरून मुंबई कडे येत होती.

Advertisement

 

तमिनाची हालचाल पूर्ण बंद झाल्‍याने शंका आली –
तमिणा बस मधून प्रवास करत होती. खाजगी बस नेरुळ या ठिकाणी आल्यानंतर तरुणी काहीच हालचाल करत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर तमिणाला नेरूळ या ठिकाणच्या डी. वाय. पाटील या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.

Advertisement

 

यावेळी डॉक्टरांनी तपासले असता तरुणी मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरनात नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परंतु प्रवास करत असताना अचानक मृत्यू कसा झाला? याचा घटनेचा अधिक तपास नेरुळ येथील पोलीस करत आहेत. घटनेची माहिती तपास पूर्ण झाल्यावर देऊ असे पोलिसांनी सांगीतले.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *