तिसरी नापास कवीला मिळाला पद्मश्री; पुरस्कार नेण्यासाठी पैसे नसल्याने पोस्टने पाठवून देण्याची केली विनंती

दिल्ली | कलाकार होण ही एक दैवी शक्ती आहे. प्रत्येक कलाकाराच्या अंगी त्याचे वेगळे असे गुण असतात. या गुणांच्या जोरावर अनेक जण मोठे होतात. बक्कळ पैसा कमवतात. प्रसिद्धी मिळवतात. मात्र असेही काही कलाकार आहेत यांनी आपल्या कलेसाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावलं आहे.

 

मात्र आजही त्यांच्या दोन वेळेच्या जेवणाची नीट सोय होऊ शकलेली नाही. त्यातीलच एक प्रसिद्ध कवी हलधर नाग ज्यांच्या नावाच्या आधी कधीच श्री जोडले गेले नाही. त्यांनी आजवर आपल्या कलेसाठी खूप संघर्ष केला. मात्र यशाने त्यांचे दार आता असे काही ठोठावले आहे. की, ते यश स्वीकारायला देखील त्यांची झोळी कमी पडत आहे. 3 जोड कपडे, एक तुटलेली रबरी चप्पल, एक खराब चष्मा आणि 732 रुपयांच्या संपत्तीचे हलधर नाग हे मालक. काल पद्मश्री हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला.

 

हलधर नाग कोसली भाषेतील प्रसिद्ध कवी आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आतापर्यंत लिहिलेल्या सर्व कविता आणि 20 महाकाव्ये त्यांना अगदी तोंड पाठ आहेत. त्याचे साहित्य आता अभ्यासक्रमाचा भाग देखील बनत आहे. त्यांच्या लेखनाचे संकलन ‘हलधर ग्रंथावली-2’ संबलपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात जोडले असून याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. साधे कपडे, पांढरे धोतर, गमछा आणि बनियान परिधान केलेले हे महान कवी अगदी अनवाणी पायांनीच राहतात.

 

आता असा हा हिरा चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोधून काढला आहे. ज्यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दल शिकायला मिळेल तेव्हा नक्कीच या कवींबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रेरणा निर्माण होईल. जिद्द आणि चिकाटी नेमकी काय असते हे त्यांना समजेल. हलधर हे एका गरीब दलित कुटुंबातील आहे.

 

वयाच्या 10 व्या वर्षी आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांनी तिसरीतच शिक्षण सोडले. अनाथाचे जीवन जगत त्यांनी अनेक वर्षे ढाब्यात भांडी साफ करण्याचे काम केले. नंतर त्यांना एका शाळेत स्वयंपाकघर सांभाळण्याचे काम मिळाले. काही वर्षांनी बँकेकडून अवघ्या 1000 रुपयांचे कर्ज घेतले. कर्जन घेऊन त्यांनी शाळेसमोर पेन-पेन्सिल या वस्तूंचे छोटेसे दुकान उघडले.

 

आता त्यांच्या साहित्यिक वैशिष्ट्याची माहिती घेऊ. हलधर यांनी 1995 च्या आसपास स्थानिक ओडिशा भाषेत “राम-शबरी” सारख्या काही धार्मिक विषयांवर लिहिले. भावनेने भरलेल्या कविता लिहून आणि त्या लोकांसमोर मांडून ते इतके लोकप्रिय झाले की या वर्षी राष्ट्रपतींनी त्यांना त्यांच्या साहित्यासाठी पद्मश्री देऊन सन्मानित केले. तर हलधर यांनी स्वतः तिसरीपर्यंत शिक्षण घेतले आहे. मात्र, त्यांच्या साहित्यावर आता 5 विद्वान पीएचडी करत आहेत. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button