थोड्याच दिवसात मिळणार होती गोड बातमी, त्यापूर्वीच तरुणीचा झाला मृत्यू; वाचून डोळ्यात पाणी येईल

सासवड  : कोणाचं मृत्यू कशाने आणि कधी होईल हे कोणीही ठरवू शकत नाही. पुणे जिल्ह्यात असणारे सासवड शहर मधील बांधकाम व्यावसायिक सुनील नाना जगताप यांची मुलगी अनुष्का जगताप या तरुणीचा बिल्फिंच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनुष्का ही दिनांक २ एप्रिल या दिवशी त्यांच्या उत्तम सोसायटी मधील पाठीमागच्या जागेत स्वतःच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडली. अपघात झाल्यानंतर पुण्या मधील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये अनुष्काला घेऊन गेले असता दि. ४ रोजी अनुष्काचे निधन झाले.

 

मिळालेल्या माहितीनुसार अनुष्काचे सर्व कुटुंबीय हे नव्या बिल्डिंगची पाहणी करण्यासाठी गेले असता अनुष्काला फोन आला म्हणून गडबडीत खाली येत असताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमध्ये अनुष्काला जबर मार बसला होता. तिच्या डोक्याला मार लागल्याने तिच्या नाकातून आणि कानातून रक्त स्राव येत होता.

Advertisement

 

अनुष्का जगताप हिने सासवडमधील वाघिरे महाविद्यालया मधून बीएसस्सी पूर्ण केली होती. अनुष्काच्या मृत्यूमुळे सासवड बरोबर त्यांचे मूळ गाव ताथेवाडी या ठिकाणी सुद्धा दुःखाची छाया पसरली आहे. सासवड मधील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक शरद जगताप यांची अनुष्का ही पुतणी होती. अनुष्काच्या मृत्यूमुळे संपूर्ण सासवड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घरातील तरुण मुलीचा असा अचानक जाण्यामुळे संपूर्ण जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.

Advertisement

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *