मालिका विश्व हादरलं! प्रसिध्द अभिनेत्याचे निधन; अनेक मालिकांमध्ये साकारली होती भूमिका

मुंबई| लता मंगेशकर यांच्यासह रमेश देव, बप्पी लहरी, प्रसिद्ध गायक के. के यांचे देखील निधन झाले आहे. त्यामुळे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टी याच्या मागे लागलेले शुक्ल कष्ट कधी संपणार हे काही सांगता येत नाही.

Join WhatsApp Group

 

आता देखील मराठी मालिका विश्व त्याचप्रमाणे अनेक नाटक आणि वेगळ्या भूमिका करणारे एक जेष्ठ कलाकार आपल्याला सोडून गेले आहेत.

 

या कलाकाराचे नाव गणेश जेठे असे आहे. गणेश जेठे यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. त्यांनी काम केलेल्या भूमिका सगळ्याच प्रेक्षकांना खूपच आवडल्या होत्या. त्यांच्या आशा जाण्याने अनेक जण हळहळले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गणेश यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते.

 

त्यांची प्रकृती अधिकच ढासळत गेली आणि ते कोमा मध्ये गेले. त्यांच्या निधनाचे कारण नेमके समजू शकले नाही. मात्र, त्यांना कुठेतरी गंभीर अपघात झाला. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली, असे सांगण्यात येत आहे.

 

फेसबुकवर चाहत्यांनी वाहिली श्रद्धांजली: मित्रा खरच खूप घाई केलीस जाण्याची त्या दिवशीच मी आणि नयन जाधव तुला केईम हॉस्पिटल मध्ये बघून गेलो . तुझ्याशी बोलायचं होतं , खूप गप्पा मारायच्या होत्या पण तू कोमामध्ये होतास त्यामुळे तेही करू शकलो नाही .पण मला असं वाटलं नव्हतं की तू जाशील भावपूर्ण श्रद्धांजली. गणेश जेठे यांच्या फेसबुकवरील निलेश गाडी यांनी श्रद्धांजली वाहिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button