नागराज मंजुळे घेऊन येणार या प्रसिध्द चित्रपटाचा दुसरा भाग; चाहत्यांमध्ये उत्सुकता, लवकरच ट्रेलर लाँच

मुंबई | नागराज मंजुळे यांचा सिनेमा म्हणलं की काहीतरी त्यात वेगळं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकही उत्सुकतेने वाट पाहत असतात. मंजुळे यांनी यापूर्वी सैराट, फॅन्ड्री, नाळ आणि हिंदी मधील झुंड अशे दिग्गज चित्रपट काढले आणि या चित्रपटांच्या माध्यमातून काहीतरी टचअप देण्याचा प्रयत्न केला.
झुंड चित्रपटात अमिताभ यांना घेऊन हा चित्रपट प्रदर्शित केला होता. फुटबॉल वर हा चित्रपट मंजुळे यांनी काढला होता. हा चित्रपट देखील चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. कारण या चित्रपटात नागराज मंजुळे यांनी मुख्य रोल साकारला होता. मंजुळे यांची ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.
आता नागराज मंजुळे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली आहे. नागराज मंजुळे यांनी काही दिवसांपूर्वी एका लहान मुलाचा नाळ हा चित्रपट प्रकाशित केला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.
मात्र लहान मुलाच्या भूमिकेतील चैत्या पुन्हा झळकणार आहे. नाळ चित्रपटात पुढे काय होणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. नागराज मंजुळे यांनी नाळ 2 ची घोषणा केली आहे. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे. त्यांनी सोशल मीडियावर ही घोषणा केली आहे. त्यामुळे चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.