आई – वडिलांची एक चूक झाली आणि ३ वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला

बेलापूर | येथे झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात जखमी झालेल्या तीन वर्षाच्या चिमुरडीचा दरम्यान मृत्यू झाला. बेलापूर गावातील गाडी गल्ली या ठिकाणी राहणाऱ्या शशिकांत शेलार यांच्या घरात असणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर टाकीचा स्फोट झाला. या झालेल्या स्फोटामध्ये घरात असणारे शशिकांत शेलार सोबत आणखी चार जण जखमी झाले होते.

 

स्फोटामध्ये जखमी झालेल्या पैकी शशिकांत शेलार यांची मुलगी नमोश्री शेलार हिच्यावर लोणी येथील पी एम टी रुग्णालयात उपचार चालू होते. मात्र नमो श्री चे शरीर हे उपचाराला साथ देत नसल्यामुळे नमोश्री ची प्राणज्योत मालवली. नमोश्री ही अवघ्या सात वर्षाची चिमुरडी होती.

Advertisement

 

मिळालेल्या माहितीनुसार शेलार यांच्या घरातील गॅस टाकीची गळती चालू होती. अशातच स्वयंपाक करण्यासाठी गॅस चालू केला होता. गॅस ची गळती झाल्यामुळे गॅस टाकीचा स्फोट झाला. यात शशिकांत शेलार सोबत कुटुंबातील इतर चार जण जखमी झाले.

Advertisement

 

यामध्ये नमोश्री ही सात वर्षाची चिमुरडी देखील गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी लोणी येथील हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले मात्र तिच्या शरीराने उचारास साथ न दिल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *