‘द कपिल शर्मा’ शो पडला बंद; ‘या’ कारणामुळे लागला ब्रेक

मुंबई | कॉमेडीचा बादशहा असलेला ‘द कपिल शर्मा’ शो आता बंद होणार आहे. या शोन आजवर लाखो प्रेक्षकांना खूप हसवले. मात्र आता हा शो बंद होणार असल्याने चाहते नाराज आहेत. त्यामुळे अनेक जण असं होऊ नये अशी मागणी करतायत. अशात आता हा शो नेमका का बंद होणार आहे या विषयी जाणून घेऊ.

 

• यामुळे द कपिल शर्मा शो होणार बंद
‘द कपिल शर्मा’ गेली ६ वर्षे प्रेक्षकांची मने जिंकत आहे. २३ एप्रिल २०१६ रोजी हा शो सुरू झाला होता. आता पर्यंत याचे ५ सीजन पूर्ण झाले आहेत. अशात आता हा शो बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

 

तर प्रेक्षकांनी जास्त चिंता करण्याचं काम नाही. कारण हा शो जरी बंद होणार असला तरी तो काही दिवसांसाठी बंद राहणार आहे. म्हणजे हा शो थोडा ब्रेक घेत आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण कपिल शर्मा आणि त्यांची पूर्ण टीम पुढील कामाच्या संदर्भात अमेरिकेला रवाना झाली आहे.

 

त्यामुळे आता याच्या ६ व्या सीजन साठी प्रेक्षकांना बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. ‘द कपिल शर्मा’ हा शो जेव्हा पहिल्यांदा सुरू झाला होता तेव्हा यामध्ये त्यांचा पहिला पाहूणा म्हणून शाहरुख खान आला होता.

 

शाहरुख हाच यांचा पाहिला पाहून आल्याने या शोचा पहिलाच कार्यक्रम खूप हिट झाला. त्यानंतर या शो मध्ये अनेक दिग्गज कलाकार मंडळी आली. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला खळखळून हसायला भाग पाडणारा हा शो आहे.

 

अनेक कलाकार आपले चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या शो मध्ये चित्रपटाच्या प्रमोशन साठी येत असतात. यामध्ये आता पर्यंत करीना कपूर, सलमान खान, अमिषा पटेल, नाना पाटेकर, कतरीना कैफ, जान्हवी कपूर असे बॉलिवूडमधील जवळजवळ सर्वच कलाकार येऊन गेले आहेत.

 

नवज्योत सिंह सिद्धू सुरवातीला पर्मनंट हाऊस गेस्ट म्हणून आला होता. त्यानंतर पर्मनंट हाऊस गेस्टची जागा अर्चना सिंहने घेतली. त्यानंतर सुनील ग्रोवरने या शो मध्ये होस्ट बरोबर भांडण केले होते. त्यामुळे नंतर त्याने हा शो सोडून दिला. नुकताच समाप्त झालेल्या या शो मध्ये कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर आणि सुमोना चक्रवर्ती दिसले होते.

 

तर या शोचा पाचव्या सीजनचा फिनाले एपिसोड खूप भव्य दिव्य राहिला. यामध्ये कमल हसन पाहुणे म्हणून आले होते. आपल्या ‘विक्रम’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते येथे आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button