या कारणांमुळे झाला भारतीय संघाचा पराभव; रोहीत शर्माने मौन सोडलं

ॲडलेड | T20 विश्वचषकात भारत विरुद्ध इंग्लंड हा सेमीफायनलचा सामना रंगला होता. या सामन्यात भारतानं चाहत्यांच्या आशेवर पाणी फेरलं आहे. भारतीय संघान सुरुवातीला 169 धावांच टार्गेट दिलं. इंग्लंडने ते टार्गेट अगदी सहजरीत्या चेस केलं. अशावेळी एकाही फलंदाजांची विकेट भारतीय संघाला काढता आली नाही. यामुळे हा भारताचा लाजिरवाणा पराभव समजला जातोय.
सुरुवातीला इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. अशावेळी आणि भारताचे काही खेळाडू लवकरच तंबूच्या आश्रयाला गेले. के. एल. राहुलने 5 धावा केल्या. त्याचप्रमाणे कर्णधार रोहित शर्माने 28 चेंडूत 27 धावा करत परतला. पहिल्या 10 ओव्हेरमध्ये म्हणजेच 60 चेंडूत केवळ 62 धावा केल्या होत्या.
काय म्हणाला कर्णधार रोहित शर्मा – भारतीय कर्णधार रोहित शर्माने सेमी फायनल सामन्यातील पराभवावर भाष्य केलं आहे. तो म्हणाला की टीमच्या या कामगिरीमुळे खूपच नाराज आहोत. फार निराशजणक कामगिरी केली. सुरुवातीला फलंदाजी अगदी हळू होती. नंतर चांगली फलंदाजी झाली परंतु खेळाडूंवर दबाव देखील आला होता. अशावेळी खेळाडूंना सामना खेळणं फारच कठीण जात होतं. अगदी 16 व्या ओव्हेरमध्ये सामना चेस करतील अस वाटल नव्हत. तेथील पीच देखील तशी नव्हती. अस परखड मत रोहितने व्यक्त केलं आहे.
तसेच तो म्हणाला की सुरुवातीला थोड नर्व्हस होतो. विजयाचं श्रेय हे इंग्लंडचे ओपनर फलंदाजांना द्यावं लागेल. त्यांची फलंदाजी ही तुफानी होती. हीच फलंदाजी रोखण्यासाठी आम्ही अपयशी झालो. आम्हाला योग्य नियोजन करता आलं नसल्याचं रोहित शर्माने म्हटल आहे.