रात्री झोपलेले पती पत्नी सकाळी उठलेच नाहीत, वाचून डोळ्यात पाणी येईल

दुबई: कधी कोणावर काळ डाव टाकेल, आणि कोणत्या वेळी टाकेल हे कोणीच सांगू शकत नाही. दुबई मधील अपार्टमेंटला लागलेल्या आगीत होरपळून भारतीय जोडप्याचा करुण अंत झाल्याची घटना घडली आहे. इफ्तारचं जेवण तयार करत असताना शेजारी राहणाऱ्या कुटुंबासोबत अशी भयानक दुर्घटना घडली. राजेश कलंगदन वय वर्षे ३८ आणि जेशी कलंगदन ३२ वर्षे अशी या जोडप्याची नावं आहेत.
त्यांच्या शेजारी राहणाऱ्या इमाम कासिम ४३ वर्षे आणि एस मोहम्मद रफीक यां दोघांचाही मृतांमध्ये समावेश आहे. या घडलेल्या दुर्घटने मध्ये एकूण १६ जण मृत्यूमुखी पडले असून बरेच जखमी झाले आहेत. राजेश हे एका ट्रॅव्हल कंपनी मध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर या पदावर काम पाहत होते, तर त्यांची पत्नी जेशी या शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या.
ते राहत असलेल्या अपार्टमेंटला १५ एप्रिल रोजी आग लागली. ज्यावेळी ही दुर्घटना घडली तेव्हा हे दोघेही गाढ झोपेत होते. दोघांचाही श्वास गुदमरल्यानं त्यांचा बिल्डिंग मध्येच मृत्यू झाला. दुबई जवळ असलेल्या दायरा या ठिकाणी अल मुरार परिसरात असलेल्या बिल्डिंगला दुपारच्या वेळी आग लागली. अग्निशमन दलाला साडे बाराच्या सुमारास याची माहिती मिळाली, असं खलीज टाईम्सनं वृत्तात सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं बिल्डिंगला आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज सांगितलं जातं आहे. बिल्डिंगला आग लागल्याचा नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. आग एवढी भयानक होती की इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून आगीचे तसेच धुराचे लोट दिसत असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं.
या आग लागलेल्या बिल्डिंगमध्ये अनेक परदेशी नागरिक राहत होते. दुर्घटने मधील मृतांमध्ये चार भारतीय नागरिक, तीन पाकिस्तानी नागरिक कॅमेरुन, इजिप्त, जॉर्डनच्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. दुर्घटनेतील नागरिकांचे मृतदेह सरकारकडून मायदेशी पाठवण्याची तयारी करण्यात आली आहे.
राजेश व मी केरळ मधील एकाच गावामधील आहोत. राजेश सामान्यतः १० वर्षां या ठिकाणी आलो, अशा शब्दांत राजेश यांचे मित्र मन्सूर अली यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राजेशच्या बिल्डिंगला आग लागल्याचं कळताच मी हॉस्पिटल मध्ये धाव घेतली. राजेश आणि त्याची पत्नी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असतील, अशी माझी आशा होती. परंतु दोघेही रुग्णालयात उपचार घेत नव्हते . त्यांचे मृतदेह शवागारात आढलुन आले आणि मला धक्काच बसला, असं अली यांनी बोलताना सांगितलं. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या दुर्घटनेचा तपास करीत आहेत.