घरची परिस्थिती हालाखीची, मात्र त्याने आता करोडोंची संपत्ती केलीय गोळा; एमसीची स्टोरी वाचून डोळ्यात पाणी येईल

मुंबई | बिग बॉस हा रियालीटी शो सद्या कलर्सवर सुरू आहे. या शोमध्ये काही पॉप्युलर अभिनेते,अभिनेत्री, मिस वर्ल्ड तर काही रिल्स स्टार आहेत. यातच सीजन 16मध्ये 80 हजारांची बुट आणि दीड कोटींची साखळी घालणारा व्यक्ती आहे. त्याच नाव एमसी स्टॅन होय. तो पुणे शहरात राहतो. जगभरात त्याचे चाहते आहेत. त्याचे रॅप हे त्यान भोगलेल्या घटनांची सावलीच आहे.
सहावीला असताना पहिला रॅप लिहला – एमसी स्टॅनचा जन्म ३० ऑगस्ट १९९९ रोजी जन्म पुणे येथील एका गरीब मुस्लिम कुटुंबात झाला. एमसी स्टॅनचे खरे नाव अल्ताफ शेख आहे. पण लोकं त्यांला तुपाक या नावानेही ओळखतात. एमसी स्टॅनने बाराव्या वर्षी करिअरला सुरुवात केली होती. तो वयाच्या बाराव्या वर्षापासून कव्वाली गाायचा.
त्यान भारतातील आणि जगभरातील अनेक मोठ्या गायकांसोबत स्टेजवर परफॉर्म केलेत. सहावीला असताना त्यान रॅप लिहायला सुरुवात केली. आठवीला असताना त्यान पहिला रॅप गायला. त्यान त्याचा व्हिडीओ शूट केला होता पण काही कारणास्तव तो व्हिडिओ रिलीज होऊ शकला नाही.
कुटुंबीयांनी रॅप गाण्याला कधीच पाठिंबा दिला नाही. ते नेहमी त्याला टोमणे मारायचे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे, तरीही ते वेळ फुकट घालवतोय असे शेजारी नातेवाईक त्याला म्हणायचे. पण एमसी स्टॅनने कधीही हार मानली नाही आणि तो कठोर परिश्रम करत राहिला.
‘ वटा’ हा रॅप झाला प्रसिद्ध – 2018 साली त्यान ‘वटा’ नावाचा रॅप गायला. या व्हिडिओला यूट्यूबवर 21 मिलियन्सहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. MC Stan च्या कुटुंबाची परिस्थिती सुरुवातीला इतकी वाईट होती की MC Stan ला सुरुवातीच्या काळात आपला अभ्यास सोडावा लागला होता.