मनोरंजन विश्वाला लागली कोणाची नजर! आणखी एका प्रसिध्द अभिनेत्याचे निधन

मुंबई | एखादा चित्रपट बनवल्यानंतर तो जास्तीत जास्त हिट होण्यासाठी जेव्हा चित्रपट बनवला जातो तेव्हाच त्यावर भरपूर खर्च करावा लागतो. चित्रपटामध्ये उत्तम दर्जाचे कॅमेरे त्याचबरोबर साऊंड सिस्टिम आणि इतर सर्वच गोष्टींची चांगली व्यवस्था करावी लागते. तेव्हा चित्रपट खूप छान पद्धतीने पडद्यावरती रेखाटला जातो. चित्रपट व्यवस्थित रेखाटला गेला नाही तर यामध्ये दिग्दर्शकाचे प्रचंड नुकसान होते. कारण चित्रपट न चालल्याने सर्व पैसा वाया जातो.

 

असंच काहीसा प्रकार एका प्रसिद्ध दिग्दर्शकांबरोबर घडला. त्या दिग्दर्शक आणि त्याच्या कारकिर्दीत प्रचंड प्रसिद्धी आणि पैसा कमावला. सर्वात श्रीमंत कलाकारांमध्ये त्याचे नाव पहिल्या क्रमांकावर लागत होते. मात्र एका चित्रपटासाठी त्याने आपल्याकडे असलेला संपूर्ण पैसा पणाला लावला. खूप मेहनतीने चित्रपट बनवला मात्र तो चित्रपट चाललाच नाही. त्यानंतर त्या दिग्दर्शकावर खूप वाईट दिवस आले. एका छोट्याशा खोलीत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Advertisement

 

ही सत्य घटना प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते भगवानदादा यांच्याबरोबर घडली. भगवानदादा यांनी मनोरंजन विश्वात प्रचंड नावलौकिक मिळवले. मनोरंजन विश्वातील त्यांची महती अगदी साता समुद्रा पार पोहोचली होती. भगवानदादा यांचं खरं नाव भगवान आबाजी पालव असं होतं. मात्र सर्व व्यक्ती त्यांना भगवानदादा या नावाने संबोधत होते.

Advertisement

 

एका अभिनेत्याच्या अंगामध्ये किती कला गुण आहेत हे ओळखण्यासाठी एक मूकपट हा सर्वात उत्तम मार्ग आहे. भगवानदादा यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात एका मुकपटातूनच केली होती. क्रिमिनल हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या मुक चित्रपटातून त्यांनी प्रसिद्धीचे मोठे शिखर गाठले. भगवानदादा यांची सुरुवातीची परिस्थिती फार बिकट होती. घरी फार गरिबी होती मात्र तरीदेखील त्यांनी अभिनय क्षेत्रामध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला होता.

 

पहिल्याच मूक पटामध्ये यश मिळवल्यानंतर त्यांचा हिम्मत ए मर्दा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याकाळी या चित्रपटाने तिकीट बारीवर बक्कळ कमाई केली. हळूहळू अभिनय क्षेत्रात त्यांना फार प्रसिद्धी मिळत गेली. मोठ्या मेहनतीने त्यांनी हे सर्व यश संपादन केलं होतं. आपल्या यशाच्या जोरावर त्यांच्याकडे सात चकचकीत महागड्या गाड्या होत्या. तसेच एक आलिशान बंगला देखील होता. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे आणखीन प्रचंड संपत्ती होती. मात्र एका चित्रपटामुळे त्यांनी हे सर्व गमावले.

 

हस्ते रहना हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी त्यांनी आपले सर्व संपत्ती पणाला लावली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर सफशेल फ्लॉप ठरला. त्यामुळे त्यांचा सर्व पैसा वाया गेला. पुढे 25 लाखांचा बंगला विकून त्यांनी चाळीमध्ये घर घेतले. इथे ते भाड्याने राहत होते. याच ठिकाणी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आणि या श्रीमंत अभिनेत्याचा पुन्हा एकदा दारिद्र्यात मृत्यू झाला.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *