दुर्दैवी! मेंढ्यांना धुवायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा अंत; घटनेनं जिल्हा हादरला

अहमदनगर | जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत झाला आहे. त्यामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. ते मेंढ्या व्यावसायिक होते. मेंढ्यांना धुण्यासाठी ते जवळील पाझर तलावात गेले होते.

 

त्यातील एक भाऊ तलावात पडला, आणि त्याला वाचविण्यासाठी दुसरा दुसऱ्या भावाने उडी घेतली. मात्र दोघांना पोहता येत नव्हते. त्यामुळे दोघांचाही एकाच तलावात मृत्यू झाला आहे. संदीप दत्तात्रय अकोलकर (वय – २८) आणि बाप्पू दत्तात्रय अकोलकर (वय – २२) असे मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत.

 

तलावाच्या कडेला मेंढ्या दिसत आहेत. मात्र तरुण दिसत नाहीत. अशी चर्चा गावात पसरली. त्यानंतर इतर काही तरुण त्या तलावाच्या दिशेने आले. मात्र दोन्ही सख्खे भाऊ बुडाले होते. त्यामुळे कोणालाही याचा अंदाज आला नाही.

 

अखेर तेथील तरुणांनी त्या पाण्यात उड्या घेतल्या आणि तब्बल ३० मिनिटांनंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर या बाबत माहिती जवळील पोलिसांना कळविण्यात आली. दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर अंतसंस्कार करण्यात आले. मात्र या घटनेने पूर्ण जिल्ह्यात शोक व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button