देश हादरला! सिंम्बा चित्रपटातील या प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू; १००हून अधिक चित्रपटात साकारली होती भूमिका

नाशिक | मराठी मनोरंजन विश्वाची मान अभिमानाने उंचावणारे अनेक दिग्गज कलाकार आजवर होऊन गेले. अशात आता एका प्रसिद्ध अभिनेतत्याच्या निधनाने बॉलीवूड बरोबरच मराठी सिनेसृष्टीवर दुःख आले आहे. यात एका दिग्गज कलाकाराच्या निधनाने आसमंत रडताना दिसतो आहे. कारण या कलाकाराने अभिनय शेत्रासाठी फार मोलाचे योगदान दिले. त्यांनी सिंम्बा सारख्या बहुचर्चित चित्रपटात देखील मोलाची कामगिरी केली.
अभिनय क्षेत्रात चुरस असलेले दिग्गज अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन झाले आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये विनोदी अभिनय केला आहे. भयंकर सस्पेन्स असलेल्या चित्रपटांमध्ये जर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणायचे असेल तर किशोर यांचा एक तरी शॉट हमखास पाहायला मिळत होता. त्यांच्या निधनाने आता अनेक व्यक्ती सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत शोक व्यक्त करत आहेत.
किशोर यांचे बालपण लॅमिंग्टन रोड, नौपाडा, घाटकोपर अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये गेलं. न्यू एरा हायस्कूल आणि युनियन हायस्कूल मधून त्यांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतले. त्यांचे वडील देखील अभिनय क्षेत्रामध्ये सक्रिय होते त्यामुळे अभिनयाचे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळाले. त्यांचे वडील वेगवेगळ्या नाटकांमध्ये त्याकाळी स्त्रियांच्या भूमिका साकारत होते. त्यामुळे किशोर यांना देखील अभिनयाची गोडी निर्माण झाली. आपण मोठे होऊन एक उत्तम नट व्हावे असे त्यांना वाटू लागले.
आपल्या कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर त्यांनी एकूण 95 प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. यामध्ये 20 हून अधिक मालिका, 30 चित्रपट आणि 40 ते 45 च्या आसपास नाटकांचा समावेश आहे. नाना करते प्यार हे त्यांचे व्यवसायिक नाटक तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिले असेल. या नाटकामधून त्यांना अविरत प्रसिद्धी मिळाली. मात्र त्यांच्या कारकिर्दीतील हे त्यांचे शेवटचे नाटक ठरले. 1982 साली आलेला नवरे सगळे गाढव हा त्यांनी अभिनय केलेला प्रथम चित्रपट होता.
त्यानंतर त्यांनी थरथराट, इना मीना डिका, हमाल दे धमाल धरलं तर चावतय, शेजारी शेजारी, धमाल बबल्या गणप्याची, डॉक्टर डॉक्टर, वाजवा रे वाजवा, लपंडाव, बजरंगाची कमाल, यशवंत, अस्तित्व, जिस देश मे गंगा रहता है, ये तेरा घर ये मेरा घर, हतयार, प्राण जाये पर शान ना जाये, खाकी अशा अनेक बॉलीवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले. आजही अनेक चाहते त्यांचे हे चित्रपट आवडीने पाहतात. सन 2021 मध्ये त्यांना कोरोना या आजाराची लागण झाली होती. यामध्ये त्यांचे निधन झाले.