लग्नातील कपाटाने घेतला चिमुकल्याचा बळी, वाचून डोळ्यात पाणी येईल

सातारा | गेली बऱ्याच दिवसापासून चिमुरड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यातच एक नाशिकमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. नाशिक जिल्ह्यातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले जाधव संकुल परिसरात ही घटना घडली. नियतीने घाला घातल्यामुळे फक्त तीनच वर्षात आपले जीवन थांबवावे लागले.

 

नियतीच्या घाला घातल्यामुळे हस्ता खेळता जीव या जगातून नाहीसा झाला. कालपर्यंत आई-वडिलांचे अंगाखांद्यावर खेळणारा आज या जगातून नाहीसा झाला. पोटच्या लेकराचे असे जाणे आई-वडिलांना कठीण जात होते. जन्म देणाऱ्या आई बापांना असे कधीही वाटले नसेल की ही घटना घडेल आणि अशी वेळ येईल.

Advertisement

 

मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील जाधव संकुल परिसरात राहणाऱ्या एका तीन वर्षाच्या चिमुरड्याच्या अंगावर लाकडी कपाट पडून त्याचा जागेवरच मृत्यू झाला. या तीन वर्षाच्या बालकाच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ केली जात होती. शौर्य सुजित विश्वकर्मा असे या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे.

Advertisement

 

मनाला चटका देणारी आणि रुदय हे लावून टाकणारी अशी बुधवारची पहाट विश्वकर्मा कुटुंबाच्या वाट्याला आली. शौर्य हा पहाटे साखर झोपेत असताना त्याच्या अंगावर सकाळी साडेसहा वाजता लाकडी कपाट पडल. काळा ने घाला घातल्यामुळे शौर्याला त्याच्या आई-वडिलांपासून काळाने हिरावून नेले. शौर्य हा तीन वर्षाचा चिमुरडा मुलगा होता. त्याच्या अंगावर लाकडी कपाट पडल्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. बुधवारची सकाळ पाहण्या अगोदरच शौर्य च्या अंगावर कपाट पडून त्याचा मृत्यू झाला. शौर्याच्या मृत्यूचे कारण फक्त लाकडी कपाट होते.

 

शौर्याच्या अंगावर कपाट पडल्यामुळे त्याला त्याच्या आईवडिलांनी ताबडतोब जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. यावेळी त्याच्या आई-वडिलांनी मोठेने हंबरडा फोडण्यास सुरुवात केली. डोळ्यादेखत आपल्या छोट्याशा मुलाच्या अंगावर कपाट पडून मृत्यू झाल्यामुळे दुःख आवरता येत नव्हते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोक कळा पसरली. या घटनेचा पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत. या अगोदरही अशा घटना अनेक वेळा घडले आहेत त्यामुळे पालकांनी लहान मुलावर विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *