आत्ताच्या घडामोडी

प्रसिध्द कीर्तनकार शिवलीला ताई पाटील यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; चाहत्यांमध्ये उत्साह

नाशिक | आपल्या कीर्तनातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी शिवलीला हिला आज संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो आहे. आपल्या कीर्तनाने तिने मोठा चाहता वर्ग मिळवला आहे. समाज आणि आपल्या सामान्य माणसाच्या जीवनात घडणाऱ्या अनेक घटना तिने आजवर आपल्या कीर्तनातून प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला आहे. शिवलिला सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय दिसते.

 

तिच्या कीर्तनाच्या शैलीने तिने आजवर मोठा चाहता वर्ग गोळा केला आहे. अगदी तरुण मुलं मुली देखील तिच्या कीर्तनाला आवराजून हजर राहतात. वेगवेगळ्या विषयातून ती नेहमीच प्रबोधन करताना दिसली आहे. अशात आता सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिची चर्चा रंगली आहे. यात तिच्या घरी दोन नवीन सदय दाखल झाल्याचे दिसत आहे. या दोघांचे तिने मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे.

 

नुकताच शिवलीलाचा वाढदिवस साजरा झाला. आपल्या वाढदिवसानिमित्त तिने दोन गाड्या खरेदी केल्या आहेत. यात एक चार चाकी आणि एक दुचाकी आहे. दोन्ही गाड्यांचे औक्षण करतानाचे फोटो तिने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिने स्वतः खरेदी केलेल्या या दोन्ही गाड्या पाहून तिचे चाहते खूप खुश आहेत. तसेच तिच्या या फोटोंवर अनेक जण तिला शुभेच्छा देत आहेत.

 

शिवलीला बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून आलेली दिसली होती. इथे आल्यावर ती खूप कमी वेळ घरात राहिली. एका टास्कमध्ये तिला दुखापत झाल्याने तिला विश्रांतीची गरज होती. त्यामुळे ती स्वतः हुन बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. बाहेर आल्यावर तिने पाहिले की, आपल्यावर अनेक व्यक्ती टीका करत आहेत. त्यानंतर तिने सर्व नागरिक तसेच वारकरी मंडळींची जाहीर माफी मागितली आणि आपल्या कीर्तनात पुन्हा एकदा सुरुवात केली.

 

आता नुकतेच तिने दोन गाड्या खरेदी केल्या आहेत. यामुळे ती खूप आनंदी आहे. शीवलीला सोशल मीडियावर तिचे कीर्तनाचे अनेक व्हिडिओ पोस्ट करत असते. आपले कीर्तन लोकांना समजावे तसेच ते ऐकत असताना अगदी युवक आणि लहान मुलांना देखील कंटाळवाणे वाटू नये म्हणून ती यात थोडे विनोद देखील सांगत असते. मात्र हे विनोद देखील प्रबोधन पूरक असतील याची ती नेहमी खबरदारी घेते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button