ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतील अभिनेत्रीच्या सासुच निधन; मालिका क्षेत्रातून अनेक कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली..

मुंबई| स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील बाबी आत्या विद्या कानिटकर म्हणजेच अभिनेत्री सारिका नवाथे यांच्या सासूबाई सौ वंदना विनायक नवाथे यांचे काल शुक्रवारी 21 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता दुःखद निधन झाल. सारिका नवाथे या सासूच्या निधनानंतर खूपच भावुक झाल्या आहेत त्या त्यांना आई म्हणूनच हाक मारत असत. सारिकाच्या अभिनयाचं त्या नेहमीच कौतुक करत असत सोबतच सहकलाकारांचं काम चांगलं झालं असं त्या आवर्जून म्हणत. सारिकाच्या सासू जेवढ्या हौशी होत्या तेवढीच त्यांना वाचनाची देखील आवड होती. दूरच्या नात्यातूनच सारिकाचे हर्षवर्धन नवाथे सोबत लग्न जुळले होते. त्यामुळे सासू सुनेचे त्यांच्यातील बॉंडिंग खूप घट्ट बनले होते. सासूच्या निधनाची बातमी त्यांनी सोशल मीडियावर शेअर करताच मराठी सृष्टीतील तमाम सेलिब्रिटींनी दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

 

Advertisement

सारिका नवाथे या गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे पती हर्षवर्धन नवाथे हे देखील प्रसिद्ध व्यक्ती आहेत. कौन बानेगा करोडपती या शोचा पहिला विजेता म्हणून हर्षवर्धन नवाथे यांनी मान पटकावला होता. कौन बनेगा करोडपती या शोमध्ये हर्षवर्धन नवाथे यांनी 2000 साली पार्टीसिपेट केले होते. या शोचे ते पहिलेवहिले ‘एक करोड’ चे विजेते पदाचे मानकरी ठरले होते. या शोमुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी देखील मिळाली होती. जवळपास वर्षभर त्यांच्या मागे एका सेलिब्रिटी प्रमाणे सही घेण्यासाठी गर्दी होताना त्यांनी अनुभवली होती.

 

Advertisement

 

या शोचे ते पहिलेवहिले ‘एक करोड’ चे विजेते पदाचे मानकरी ठरले होते. या शोमुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी देखील मिळाली होती. जवळपास वर्षभर त्यांच्या मागे एका सेलिब्रिटी प्रमाणे सही घेण्यासाठी गर्दी होताना त्यांनी अनुभवली होती. हर्षवर्धन यांचे वडीलही उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत होते, वडीलांप्रमाणेच हर्षवर्धन यांनादेखील अधिकारी होण्याची ईच्छा होती.

 

 

परंतु या शोमध्ये पार्टीसिपेट करून आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाल्याचे ते सांगतात. मिळालेल्या रक्कमेतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले होते पुढे मुंबईसारख्या ठिकाणी त्यांनी स्वतःचे घर आणि पहिली कार खरेदी केली होती. 29 एप्रिल 2007 साली त्यांनी अभिनेत्री सारिकासोबत लग्न केले. त्यांना सारांश आणि रेयांश अशी दोन मुलेही आहेत. पहिली शेर दुसरी सव्वा शेर या चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती.

 

 

एक डाव संसाराचा, अजिंक्य या चित्रपटात देखील त्या झळकल्या आहेत. चाणक्य, जास्वंदी यासारखे नाटकही त्यांनी साकारले आहेत. तर मध्यंतरी टाटा टी प्रीमियम च्या जाहिरातीत देखील त्या दिसल्या होत्या. याव्यतिरिक अनेक नाटकांत त्यांनी कामे केलेली आहेत. त्यानंतर त्यांची कलर्स मराठीवरील कुंकू टिकली आणि टॅटू या मालिकेत विभा कुलकर्णी यांची भूमिका साकारली होती. मोलकरीण बाई, ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील त्यांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली.

 

 

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *