या अभिनेत्रीचा मुलाला जन्म दिल्यानंतर झाला मृत्यू

मुंबई | ‘जैत रे जैत’ या सिनेमात अफाट लोकप्रियता मिळालेल्या या चित्रपटात स्मिता पाटील यांनी काम केलं आहे. जैत रे जैत या चित्रपटामधील त्यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. मृत्यूच्या काही वर्षे आधी सावध राहण्याचा इशारा अभिनेता अन्नू कपूर यांनी दिला होता.

Join WhatsApp Group

 

त्यांनी सनी देओल, अनिल कपूर यांच्यासह इतर कलाकारांबरोबर त्यांनी लोकप्रिय अशा भूमिका केल्या. छोट्या पडद्यावर देखील ते करत असलेले अनेक‌ शो प्रचंड गाजले आहेत. काही वर्षांपूर्वी स्मिता पाटील आणि अन्नू कपूर विमानामध्ये एकत्र प्रवास करत होते. अन्नू कपूर यांना भविष्य पाहता येते. अनेकांचे भविष्य ते पाहत असतात.

 

विमान प्रवास करत असताना स्मिता पाटील यांना अन्नू कपूर यांनी भविष्य सांगितले होते की, भविष्यामध्ये तू सांभाळून राहा. तुला मोठा धोका होऊ शकतो, असे त्यांनी आधीच सांगितले होते आणि काही वर्षातच स्मिता पाटील यांचा मृत्यू झाला होता. ही आठवण नुकतीच सोशल मीडियावर शेअर झाली आहे. त्यामुळे याला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.

 

मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या दमदार अभिनयाने स्मिता पाटील यांनी रुपेरी पडदा गाजवून सोडला होता. काही वर्षांपूर्वी स्मिता पाटील यांचे निधन झाले होते. स्मिता पाटील या शिवाजीराव पाटील यांच्या कन्या होत. शिवाजीराव पाटील हे आमदार होते. तसेच स्मिता पाटील यांची आई विद्याताई पाटील यादेखील समाजसुधारक होत्या.

 

स्मिता पाटील या ज्यावेळेस मृत्युमुखी पडल्या. त्यावेळी त्यांचे वय केवळ 31 वर्षाचे होते. बाळाला जन्म दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मुलाचे नाव प्रतीक बब्बर असे आहे. प्रतीक बब्बर याला आपल्या आईचे तोंड देखील पाहता आले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button