अभिनयक्षेत्र हादरलं! प्रसिध्द अभिनेत्याचे निधन; ५०हून अधिक चित्रपटात साकारली होती भूमिका
दिल्ली | मनोरंजन विश्वातून सातत्याने दुःखद बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच रसिक दवे या अभिनेत्याचे निधन झाले होते. त्याचबरोबर यावर्षी अनेक कलाकारांनी, गायकांनी, अभिनेत्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. यामध्ये अनेक तरुण कलाकारांचा देखील समावेश आहे. आता आणखीन एका तरुण अभिनेत्याचे निधन झाले आहे.
लोकप्रिय आसामी अभिनेता किशोर दास याचे शनिवारी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून तो कर्करोगाशी झुंज देत होता. यावर्षी मार्च महिन्यापासून त्याच्यावरती उपचार सुरू होते. चेन्नईमध्ये तो हे उपचार घेत होता. मात्र या दीर्घ आजाराशी त्याची असलेली झुंज वयाच्या तिसाव्या वर्षी संपली.
आसाममध्ये त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले. त्याचे निधन झाले त्यावेळी त्याची कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आल्याचे समजले आहे. गुवाहाटी येथील एका प्रादेशिक चैनल वर बिधाता ही मालिका प्रसारित होत होती. या मालिकेमध्ये किशोरने दमदार भूमिका साकारली होती. त्या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. त्याने बंधुन आणि नेडेखा फागुन या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. दादा तुमी दुस्तो बोर हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटामध्ये देखील त्याने दमदार अभिनय केला.
दादा तुमी दुस्तो बोर या आसामी चित्रपटासाठी त्याचे भरपूर कौतुक देखील करण्यात आले. अभिनेत्याच्या निधनानंतर मनोरंजन विश्वातील अनेक व्यक्तींनी सोशल मीडिया वरती त्याच्याविषयी आपली भावना व्यक्त केली आहे.
यामध्ये वर्षा राणी बिशाया या अभिनेत्रीने लिहिले आहे की, ” ओम शांती, त्याच्या आत्म्याला शांती लाभो..” तर मेघरंजनी मेधी यांनी लिहिले आहे की, ” भावा खूप कमी वयात तुझे निधन झाले. तू आमच्यातला एक असा अभिनेता होता जो शेवटच्या श्वासा पर्यंत लढला. तू नक्कीच एक तेजस्वी तारा बनवून आम्हाला पाहत राहशील.”
आसामचे राजकीय पुढारी अतुल बोरा यांनी देखील अभिनेत्याच्या निधनावरती पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी यामध्ये लिहिले आहे की, ” खूप कमी वयात तुझे निधन झाले. तू इतक्या लवकर जाशील असे वाटले नव्हते. तू एक लढाऊ अभिनेता होतास.
गुवाहाटी येथे जेव्हा तुझ्यावर उपचार सुरू होते तेव्हा मी तुला पाहायला आलो होतो, त्यावेळी तू इतक्या लवकर आमची साथ सोडशील असे मला वाटले नव्हते. तुझ्या आत्म्याला शांती लाभो. ” असे त्यांनी यामध्ये म्हटले आहे. पुढे कुटुंबीय आणि अभिनेत्याच्या मित्र परिवाराविषयी देखील सद्भावना व्यक्त केली आहे.
किशोर दासला बऱ्याच दिवसांपासून कर्करोगाचा त्रास होत होता. त्याचा हा त्रास मार्च महिन्यात अधिक वाढला. त्यामुळे त्याला चेन्नईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. इथे डॉक्टरांनी त्याच्यावर शर्तीचे उपचार केले. तीन महिने त्याच्यावरती सातत्याने उपचार सुरू होते. या काळात त्याला कोरोनाची देखील लागण झाली. त्यामुळे त्याची प्रकृती आणखी खालावली. या सर्व आजारांमुळे शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.