आत्ताच्या घडामोडी

पतीच्या त्रासाला कंटाळून प्रसिध्द अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल; वेळीच पोलीस आल्याने टळली दुर्घटना

दिल्ली | तेलगू चित्रपटांची अभिनेत्री मैथीलीने आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारी तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या आत्महत्या करण्यामागे तिच्या पतीचा हात असल्याचं समोर येत आहे.

 

गेल्या अनेक दिवसांपासून दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आणि प्रामुख्याने अभिनेत्रींच्या आत्महत्येच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. अशात पुन्हा एकदा या अभिनेत्रीने असं टोकाचं पाऊल उचललं आहे.

 

मैथिलीने हैद्राबाद येथे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस तिचा शोध घेत होते. यावेळी त्यांनी तिचा फोन ट्रक केला आणि ते तिच्या घरी पोहचले. तिथे पोलिसांना ती बेशुध्द अवस्थेत सापडली.

 

तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशात तिच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की, “इकडे तिला आणलं तेव्हा तिची तब्येत खूप चिंताजनक होती. मात्र आता ती हळू हळू बरी होत आहे.”

 

मैथिली आणि तिच्या कुटुंबीयांनी आत्महत्या करण्यासाठी तिच्या पतीला आणि सासरच्या मंडळींना जबाबदार ठरवलं आहे. तिचे सासरचे आणि तिचा पती मैथिलीवर कौटुंबिक हिंसाचार करतात. असं मैथिलीच्या घरच्यांच म्हणण आहे.

 

साल २०२१ मध्ये देखील मैथिलीने तिच्या पती श्रीधर रेडीच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिचं असं म्हणणं होतं की, श्रीधरने तिच्या “स्टार महिला” या टीव्ही शोचा तो दिग्दर्शक आहे असं खोटं सांगून १३ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. त्यावेळी श्रीधर त्याच्याकडे असलेल्या गाड्या आणि दागिने घेऊन फरार झाला होता.

 

कौटुंबिक अत्याचाराला आजही अनेक महिला बळी पडताना दिसतात. मात्र यामधून अभिनेत्रींची देखील सुटका झालेली नाही. मैथिली सारख्या अनेक मुली असं टोकाचं पाऊल उचलतात. अशात तेलगू अभिनेत्रींचे आत्महत्येचे प्रमाण वाढूलागल्याने सर्वत्र चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button