Team India: रोहित – विराटचा होणार पत्ता कट? भारतीय संघाला मिळणार नवीन कर्णधार

मुंबई | अवघ्या एका विकेटने भारताचा बांगलादेशाकडून पराभव झाला. या सामन्यात हसनने ५ गडी बाद केले होते. त्यानंतर हसन मिरज ने भारीच खेळी केली. त्याने तीन सामन्यांमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. बंगला देश ने १३६ धावांमधे ९ विकेट गमावल्या. परंतु भारतीय टीमने यापुढे ६ ओव्हर मध्ये एकही विकेट काढली नाही. त्यामुळे भारतीय टीम ला पराभव पत्करावा लागला. हा लाजिरवाणा विक्रम रोहितच्या नावावर पडला गेला.

 

पुढीलवर्षी जानेवारी महिन्यात भारत विरुद्ध श्रीलंका ही मालिका खेळली जाणार आहे. परंतु या मालिकेसाठी निवड समिती ही नवीन खेळाडूंना संधी देणार आहे. असे बीसीसी आय च्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. भारतीय टीम चा पराभव हा सौरभ गांगुली यांच्या नावाने पहिला झाला होता, तर दुसरा पराभव हा रोहित कर्णधार असताना झाला.

Advertisement

 

सौरभ गांगुली हे भारतीय टीम चे कर्णधार असताना २००४ साली १५ धावांनी पराभव झाला होता. त्यावेळी बांगलादेश सोबत भारताचां सामना होता. बांगलादेश त्यावेळी पासून एक दिवसीय सामन्यात ६ वेळ जिंकला आहे. २००७ साली एकदिवसीय वर्ल्डकप सामन्यात राहुल हा कर्णधार होता. त्यावेळी सुध्दा भारताला पराभव पत्करावा लागला होता. २०१५ साली ७९ धावांनी पराभव पत्करावा लागला त्यावेळी धोनी हे भारतीय संघाचे कर्णधार होते. तर यावर्षी सात वर्षानंतर बंगला देशाकडून पराभव होणार रोहित हा ४था कर्णधार आहे.

Advertisement

 

मेहदी हसन आणि मुस्तफिझुर यांनी ४२ चेंडूत ५१ धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघ पराभव होण्याच्या मार्गावर गेला. बांगलादेश ने ९ गडी बाद होऊन ही सामना जिंकला भारताची सर्वात कमी धावसंख्या असणारी ही बंगला देश सोबत २ री मालिका होती. ४० षटकांमध्ये १३६ धावा तर ९ विकेट पडल्या होत्या. भारतीय संघ जिंकण्याची आशा होती परंतु राहुल आणि शिखर धवनने झेल सोडले. बांगलादेशाला ३२ धावांची गरज होती. तिसऱ्या वेळेस वाशिंगटन सुंदरणे सुध्दा झेल सोडला त्यामुळे भारताला पराभव पत्करावा लागला.

 

आणि यामुळे भारतीय संघात बडे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोहित आणि विराट कोहलीचा पत्ता कट होऊ शकतो. असे देखील बोलले जात आहे. निवड समिती नवीन कर्णधाराचां शोध घेत असल्याचे देखील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात संघाची सूत्रे कोणाला मिळणार? असा सवाल व्यक्त केला जात आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *