टीम इंडियाला लागली कुणाची नजर! बुमराहची जागा घेणाऱ्या बॉलरला मोठी दुखापत

मुंबई | काही वेळा लक फॅक्टर असतं अस म्हंटल जात. असच काहीस इंडियन क्रिकेट संघासह घडताना पहायला मिळतंय. सुरुवातीला रवींद्र जडेजा त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि आता राहुल चाहर हा देखील दुखापतग्रस्त झालाय. एक नाही तर तब्बल तीन खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. अशावेळी इंडिया संघाच नशीब कुठ तरी पाठ फिरवतय.

Join WhatsApp Group

 

जसप्रीत बुमराह ऐवजी राहुल चाहर खेळणार होता. परंतु त्याच्याही पायाला दुखापत झाल्यान आता तो देखील T-20 विश्वचषकात खेळणार नसल्याचं समजतंय. हे वृत्त स्पोर्ट्स तकने दिलंय. 16 ऑक्टोंबरला ऑस्ट्रेलियात T-20 विश्वचषक सुरू होणारय. दिपक दक्षिण आफ्रिकेच्या तीन सामन्यांच्यामालिकेत खेळला नाही.

 

दीपक चाहर यापूर्वी दुखापतीमुळेच आयपीएलच्या संपूर्ण सीजनला मुकला. चार-पाच महिन्यानंतर झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे सीरीजमधून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. दीपक चाहर तेव्हापासून चांगल्या फॉर्ममध्ये होता. रिझर्व्ह खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या वर्ल्ड कप टीममध्ये त्याला स्थान देण्यात आलं होतं. आता तो जाणार नाही. त्याची जागा आता मुंबईचा शार्दुल ठाकूर हा खेळाडू घेणार आहे.

 

तीन खेळाडूंचा ऑस्ट्रेलिया दौरा – मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर हे 13 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. सध्या टीम इंडिया पर्थमध्ये टी 20 वर्ल्ड कपची तयारी करतेय. त्या ठिकाणी हे तिन्ही गोलंदाज टीममध्ये सहभागी होतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button