‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील या अभिनेत्याने सोडली कायमची मालिका; धक्कादायक कारण आले समोर

मुंबई | छोट्या पडद्यावर झळकत असलेली मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा, या मालिकेला एक वेगळं वळण लागले आहे. अल्पावधीत या मालिकेने करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. ही मालिका TRP च्या बाबतीत सर्वात अव्वल स्थानी देखील राहिली आहे.

 

या मालिकेला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. मात्र सध्या या मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेल्या एका अभिनेत्याने मालिका सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत.

 

ही मालिका मुख्य दोन पात्रांवर चालली आहे. त्यातील एक म्हणजे जेठालाल आणि दुसरे म्हणजे तारक मेहता, या दोन पात्रावर ही मालिका आधारित आहे. या दोघांच्या अभिनयामुळे ही मालिका टेलिव्हिजनवर अव्वल स्थानी जाऊन पोहचली आहे.

 

मात्र धक्कादायक बाब अशी की या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेले तारक मेहता हे पात्र साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडली आहे. त्यामुळे रसिकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे.

 

मिळालेल्या माहिती नुसार लोढा यांची सेट वर भांडण झालं होत. त्यामुळे तेथील दिग्गज त्यांना बोलतं नव्हते, तसेच दिलेल्या तारखांचा योग्य वापर न झाल्याने, तसेच मालिकेच्या करारामुळे ते नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.

 

मालिकेच्या करोडो रसिकांना हा मोठा धक्का मानला जात आहे. लोढा यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. त्यांच्या अचानक मालिका सोडण्याच्या निर्णयामुळे त्यांच्यावर देखील अनेक जण नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button