संतोष मुंडेच्या निधनावर सूरज चव्हाण हळहला! भावूक होऊन म्हणाला… ‘संतोष वाघा…’

मुंबई | करंट लागून मंगळवारी संतोष मुंडेंचं निधन झालं. त्याच्या निधनाने सर्व टिकटॉक प्रेमींना दुःख झाले आहे. अनेक लोकांनी संतोष ला सोशल मीडिया च्या माध्यमातून श्रद्धांजली देखील अर्पण केली आहे. संतोष मुंडे आणि सूरज चव्हाण हे दोघेजण खूप कट्टर मित्र होते. त्यांची मैत्री सर्व लोकांना माहीत होती.
लोकांनी या दोघांना मनोरंजन क्षेत्रात चांगलेच उचलून धरले होते. सोशल मीडियावर संतोष ला दिड लाख फॉलोवर्स मिळाले होते. तर सूरज चव्हाण ला 6 लाखापेक्षा जास्त फॉलोवर्स मिळाले होते. संतोष हा बीड चा तर सूरज बारामतीचा आहे. दोघेही एकत्र रील करत असत. पण संतोष च्या अशा अचानक जाण्याने सूरजला सुधा धक्का बसला होता. तो म्हणतो की नमस्कार भावांनो, आज दुःख होत आहे. संतोष मी तुला मिस करत आहे. लोक गेल्यावर खांद्यावर येतात अगोदर कोणी नाही येत. असे व्हिडीओत सूरज ने म्हंटले आहे.
वाघा तुला भावपूर्ण श्रद्धांजली, आता तू परत कधी येणार असेही व्हिडीओत लिहून पाठवले. संतोष मुंडे हा काही डान्सर वैगेरे नव्हता त्याने आपल्या विनोदी भाषेत ग्रामीण भाषा वापरून खूप प्रसिध्दी मिळवली होती. संतोष चे दीड लाख तर सुरचे सहा लाख फॉलोवरस इंस्टाच्या अकाउंटला आहेत. बाहेर कुठे गेले ते तर संतोष चा सत्कार होत असत. अशा या रिल्स स्टार चा मृत्यू झाला त्यामुळे सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली.