अंधश्रद्धेने घेतला चिमुकलीचा बळी, वाचून डोळ्यात पाणी येईल

Pune | नजर लागू नये यासाठी गळ्यात बांधलेला दोराच एका चिमुकलीच्या जीव जाण्याचं कारण ठरला आहे. छिंदवाडा या ठिकाणी ही दुःखद घटना घडली आहे. लहान मुलगी खेळता-खेळता याच गळ्यात असणाऱ्या धाग्याने तिला फाशी लागली. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, तिथे चिमुरडीचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
देहाट या ठिकाणच्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्या कडून मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण शहरालगत असलेल्या पोमा या गावात घडले आहे. येथे वास्तव्यात असणाऱ्या सुनील अहिरवार यांची ९ वर्षीय मुलगी सिमरन अहिरवार ही काही मुलांसोबत खेळत होती. खेळत असताना तिने तिच्या बोटाने गळ्यातील दोरा गुंतवला, त्या दोऱ्याला गाठ पडली. त्यामुळे हा धागा गळ्यात इतका घट्ट फसला की तिला श्वास घेणंही अवघड झालं. ती बेशुद्ध झाली, कुटुंबीयांनी लगेच तिला उपचार करण्यासाठी घेऊन रुग्णालयात दाखल केलं.
छिंदवाडा या ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयात तिला नेलं तेव्हा तिची प्रकृती पार चिंताजनक होती. डॉक्टरांनी या चिमुरडी मुलीला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्या मुलीचा जीव वाचू शकला नाही. या घटनेनंतर चिमुरडीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तर तिच्या आईच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले आहे.
या घटनेमध्ये मृत पावलेल्या मुलीच नाव सिमरन अहिरवार अस आहे. सिमरन अहिरवार ही चिमुकली इतर मुलांसोबत खेळत होती. खेळत असताना अचानक तिच्या गळ्याभोवती बांधलेला धागा घट्ट झाला आणि तिचा गळा आवळला गेला. त्यामुळे तिला अस्वस्थ वाटू लागले, तिचा श्वास बंद झाला. सोबत खेळत असणाऱ्या मुलांनी लगेच सिमरनच्या घरच्यांना याची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीय तिला लगेच रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, तोपर्यंत फारच उशीर झाला होता. हा धागा इतका घट्ट बसला होता की सिमरनचा श्वास पूर्ण बंद पडला. डॉक्टरही या चिमुरडीला वाचवू शकले नाहीत.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण कुटुंब शोककळेत बुडालं आहे. चिमुरड्या सिमरनला निरोप देण्यासाठी अख्खं गाव जमलं, तिच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असणाऱ्या सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं होतं. सिमरनला तिच्या ५ वर्षांच्या लहान असणाऱ्या भावाने अग्नी दिला. त्यानंतर तिचा भाऊ सुद्धा बेशुद्ध होऊन पडला. या घटनेने या चिमुकलीच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहेत. पुढील तपास पूर्ण झाल्यावर माहिती देऊ असे पोलिसांनी सांगितले. घटनेमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.