‘सुंदरा मनामध्ये भरली’ मधील अभिनेत्रीचा अपघात; गंभीर दुखापत झाल्याची शक्यता

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांच्या अपघाताच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये कायम भीती पसरत आहेत. तर अनेक कलाकारांचे निधन होत आहे. यामुळे देखील धक्का बसत आहे.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिके मधील एका दिग्गज अभिनेत्रीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका अत्यंत लोकप्रिय बनली आहे.
या मालिकेचे लाखोंच्या संख्येत चाहते बनले आहेत. पुढेही ही मालिका अशीच चालू राहावी यासाठी अनेक चाहत्यांनी देवाकडे प्रार्थना देखील केली आहे. या मालिकेत अनेक दिग्गज कलाकार घडले आहेत.
या मालिकेत जयश्री हे पात्र साकारणारी अभिनेत्री पूनम चौधरी हीचा कार अपघात झाला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पूनम चा अपघात झाला यात तिच्या हाताला मार लागला आहे.
मात्र सध्या तिची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मात्र तिला सध्या काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र आणखी किती काळ ती बाहेर राहणार. याची माहिती समजू शकली नाही.