‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील दिग्गज अभिनेत्याचे निधन; मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा

मुंबई | सुप्रसिद्ध मराठी मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ चे अभिनेते अरविंद धनू यांचे निधन झाले आहे. ते 47 वर्षांचे होते. अरविंद यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्री हादरली आहे. तसेच या बातमीवर विश्वास ठेवणे अनेकांना कठीण जात आहे.

Join WhatsApp Group

 

अरविंद धनू सोमवारी मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. इथे आल्यावर त्यांना अस्वस्थ वाटले आणि त्यांचा रक्तदाब वाढला. त्यामुळे तात्काळ जवळच्या रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. पण अरविंद यांची प्रकृती आणखीन खालावत गेली. अखेर ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचा मृत्यू झाला.

 

अरविंद धनू यांनी आतापर्यंत अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम केले. परंतु त्यांना सर्वात जास्त लोकप्रियता सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून मिळाली. मालिकेध्ये त्यांनी राजकारणी आणि माधवी निमकरच्या ऑन-स्क्रीन वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांच्या व्यक्तिरेखा आणि अभिनय कौशल्याने सर्वांची मने जिंकली.

 

याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. ती ‘झील माझी लडकी’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ आणि ‘क्राइम पेट्रोल’ या मालिकांमध्ये ते झळकले होते. यासोबतच त्यांनी ‘एक होता वाल्या’ या मराठी चित्रपटात काम केले आहे.

 

त्यांच्या आकस्मित निधनाने सर्वत्र शोकाकुल वातावरण आहे. अनेक चाहते आता सोशल मीडियावर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत. तसेच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील सर्वच कलाकार देखील दुःखात बुडले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button