रेल्वे स्टेशनवर हमाली करून केला अभ्यास, अन् बनला IAS; वाचून डोळ्यात पाणी येईल

दिल्ली | स्वप्न हे नेहमी उघड्या डोळ्यांनी पहाव आणि ते पूर्ण करण्याची ताकत देखील उराशी बाळगून जगावे. असे केल्यास मार्गातील सर्व अडचणी या खूप शुल्लक आहेत असे वाटते. याचीच प्रचिती केरळच्या श्रीनाथ यांना आली. अडचीत ही बातमी तुम्हाला एका कथे सारखी वाटेल आणि तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. मात्र ही एक सत्य घटना आहे.
केरळ मधील श्रीनाथ यांना आयएएस अधिकारी व्हायचं होतं. मात्र घरात कमवणारे ते एकटेच होते. त्यामुळे त्यांनी सकाळी हमालीचे काम सुरू केले. काही दिवसांनी हमालिमधून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही हे समजल्यावर त्यांनी सेकंड शिफ्टची एक नोकरी शोधली.
आणि सुरू झाली त्याचं मेहनतीची वाट. यावेळी त्यांनी दुप्पट मेहनत घेतली. दिवसभर काम करून आपल्या सारख्या सामान्य माणसाला किती तरी थकवा येईल. मात्र त्यांना अजिबात थकवा येत नव्हता दिवसाचे १२ तास काम करून नंतरचा वेळ ते अभ्यास करत होते.
यावेळी मार्गात खूप अडचणी आल्या. बऱ्याचदा अपयश देखील आले. मात्र त्यांनी माघार घेतली नाही. एकूण ३ वेळा त्यांना UPSC मध्ये अपयश आले. मात्र मेहनत त्यांनी तशीच सुरू ठेवली. त्यानंतर चौथ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले.
आणि त्यांच्या कष्टाचे सार्थक झाले. श्रीनाथ यांची परिस्थिती फार हालाखीची असल्याने त्यांच्याकडे क्लासेस साठी जास्तीची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे कसाबसा त्यांनी एक स्मार्टफोन खरेदी केला. त्यामधून ते वेगवेगळे व्हिडिओ पाहून माहिती मिळवत होते.
असे करता करता सुरुवातीला त्यांनी केरळ राज्यसेवेची परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र त्यांची भूक अधिक वाढली आणि त्यांना UPSC परीक्षा उत्तीर्ण करण्याचे वेध लागले. त्यामुळे त्यांनी आणखीन दुपटीने अभ्यास वाढवला. एका आम्हाला पासून ते आयएएस अधिकारी इथपर्यंतचा त्यांचा हा प्रवास खरोखर अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.