आत्ताच्या घडामोडी

श्रुतीचां नवरा दिसतो खूपचं देखणा; करतोय ‘हे’ काम

पुणे | मराठी कला विश्वातील अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली आहे. तसेच काहींनी उद्योजकांशी विवाह केल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांच्या लग्नाचा धूमधडाका सुरू आहे.

 

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री श्रुती मराठे तुम्हाला माहीतच असेल, तिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारून लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. श्रुती ही मराठी अभिनेत्री असली तरी तिने हिंदी चित्रपट सृष्टीत देखील काम केले आहे.

 

तिचे मराठी चित्रपट सृष्टीला मोठे योगदान मानले जाते. आपल्या हटके लूकमुळे रसिकांच्या मनावर छाप सोडणारी अभिनेत्री म्हणून श्रुतीची ओळख आहे. तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून गेले आहेत. तिने चित्रपट सोबत मालिकांमध्ये देखील काम पाहिले आहे.

 

श्रुतीने मुंबई पुणे मुंबई 2, बाजी, संघर्ष यात्रा, राधा ही बावरी या सारख्या दिग्गज चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. श्रुतीचे लाखो चाहते आहेत. ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. तिच्या चाहत्यांना तिच्या बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते.

 

आज आम्ही तुम्हाला तिच्या खासगी आयुष्यातील म्हणजेच तिच्या पती बद्दल माहिती सांगणार आहे. श्रुतीने देखील एका मराठमोळ्या अभिनेत्या सोबत लग्नगाठ बांधली आहे. तो देखील एक प्रसिध्द अभिनेता आहे. त्याच नाव गौरव घाटनेकर असे आहे.

 

मराठी चित्रपट सृष्टीतील तो देखील एक आघाडीचा अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. फक्त चित्रपटच नाही तर त्याने अनेक मालिकांमध्ये देखील काम पाहिले आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी त्याचा काय रे रास्कला हा चित्रपट धुमाकूळ घालून गेला होता.

 

त्याने धर्मक्षेत्र, काय घडलं त्या रात्री या सारख्या दिग्गज मालिकांमध्ये भूमिका साकारली आहे. मिळालेल्या माहिती नुसार श्रुती आणि गौरव यांचा प्रेमविवाह आहे. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यानंतर त्यांनी विवाह केला आहे. सध्या त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button