नि:शब्द! तीन महिन्याच्या बाळाला आई वडिलांनी दिले गरम सळईने चटके, हृदय पिळवटून टाकणारी घटना

शहाडोल: देशात अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक घटना घडत आहेत. या घटनेमधूनच बऱ्याच वेळा दुर्घटना सुद्धा घडत आहेत. उपचाराच्या नावाखाली एका तीन महिन्याच्या मुलीला गरम सळईने 51 चटके दिल्याची घटना घडली आहे. गरम सळईने चटके दिल्यामुळे तीन महिन्याच्या बाळाची तब्येत जास्तच बिघडली गेली.

 

त्यामुळे नातेवाईकांनी उपचार करण्यासाठी शहडोल मेडिकलमध्ये दाखल केले आहे. बालकांना डाग देण्याची प्रथा अजूनही अनेक ठिकाणी चालूच आहे. डाग देण्यामुळे अनेक बालकांच मृत्यू देखील झाले आहेत. शासनाकडून बरेच वेळा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयत्न केले गेले आहेत परंतु डाग देण्याची प्रथा अजूनही बंद झाली नाही.

Advertisement

 

मुलीला निमोनिया झाला होता. मध्य प्रदेश मध्ये आदिवासी भागात आजारी पडल्यानंतर डाग देण्याची प्रथा अजूनही बरेच ठिकाणी आहे. शहडोल या ठिकाणच्या 3 महिन्याच्या मुलीला निमोनिया झाला होता तसेच तिला श्वसनचा त्रासही होता. या बाळाला बरे करण्यासाठी नातेवाईकांनी उपचार करण्याच्या नावाखाली एकदा नाही तर जवळपास 51 वेळ सळई चे चटके दिले. या चतक्यामुळे मुळे मुलगी बरी नाही झाली तर तिची तब्येत आणखीन जास्त बिघडली गेली.

Advertisement

 

दवाखान्यात घेऊन गेले असता प्रकार उघडकीस आला. बाळाची प्रकृती जास्त बिघडल्यामुळे बाळाच्या घरच्यांनी शेड्युल मेडिकल कॉलेज या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केली. मुलीची बिघडलेली तब्येत पाहून डॉक्टरांनी लगेच तिच्यावर उपचार करण्यास सुरुवात केल. डॉक्टर आणि मुलीला पहिल्या नंतर सारा प्रकार उघडकीला आला. या भागातील आदिवासी लोकांमध्ये ही प्रथा बरीच वर्षे चालू आहे. याबाबत शासनाने परिसरात खूप वेळा जनजागृती केली आहे. या अंधश्रद्धेमधून अनेक लहान लहान मुलांचे जीव जात आहेत.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *