दाक्षिणात्य सिनेसृष्टी हादरली! पत्नीच्या आत्महत्येनंतर प्रसिध्द अभिनेत्याचे निधन

दिल्ली | दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये अनेक घातपात आणि आत्महत्येच्या घटना घडत आहेत. अशात माणुसकीला काळींबा फासणारी आणखीन एक घटना या सिनेसृष्टीत घडली आहे. एका अभिनेत्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता सतीश वज्रचा त्याच्या राहत्या घरात चाकू भोकसून खून केला आहे. या घटनेने पुन्हा एकदा सिनेसृष्टी हादरले असून शोककळा पसरली आहे.
तीन महिन्यांपूर्वीच अभिनेत्याच्या पत्नीने आत्महत्या केली होती. अशात आता या अभिनेत्याची हत्या ही त्याच्या मेहुण्याने केल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश आणि त्याच्या पत्नीचं याच वर्षी लग्न झालं होतं. दोघांचे लव मॅरेज असल्याने त्याच्या पत्नीच्या कुटुंबियांना हे लग्न मान्य नव्हतं. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरू होते.
या वादांना कंटाळुन अभिनेत्याच्या पत्नीने आत्महत्या केली होती. अशात आता आपल्या बहिणीच्या आत्महत्येचा सूड उगवण्यासाठी तिच्या भावाने सतीशचा खून केला असेल. असा पोलिसांचा दाट संशय आहे.
या संपूर्ण प्रकरणावर पोलिस अधिक तपास करत आहेत. ही सर्व घटना रविवारी रात्री घडली. सतीश कामावरून घरी आल्यावर घरामध्ये आधीच दोन अज्ञात इसम होते. या अज्ञात इसमांनी तो घरात येताच त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले.
काही वेळाने घर मालक सतीशच्या घराजवळ आले तेव्हा त्यांना घरातून रक्त येत आहे असं दिसलं. घरमालकाने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. ही माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घराचे दरवाजे तोडून पोलिसांनी घरामध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना अभिनेता रक्ताच्या थारोळ्यात सापडला.
पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सदर घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच संशयित आरोपी हे फरार आहेत.
सतीशहा दाक्षिणात्य सिनेसृष्टीला मोठा कलाकार होता. तो मूळचा कर्नाटकातील मांड्य या जिल्ह्यातला होता. लगोरी हा त्याचा डेब्यू चित्रपट होता. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये सहकलाकाराची भूमिका साकारली होती.
सतीशच्या निधनाने त्याचे कुटुंबीय मोठ्या दुःखाचा सामना करत आहेत. तसेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडिया मार्फत त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचे चाहते देखील या घटनेमुळे हळहळ व्यक्त करत आहेत.