साऊथ चित्रपटसृष्टी हादरली! 34 वर्षीय प्रसिध्द अभिनेत्याची आत्महत्या; पत्नीने सोडली होती साथ

चेन्नई | गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर जगाचा निरोप घेत आहेत. त्यामुळे अभिनय क्षेत्राला झालंय तरी काय? असा सवाल व्यक्त केला जात आहे. मराठी, बॉलिवूड तसेच हॉलिवुड मधील अनेक दिग्गज कलाकारांचा मृत्यू होत आहे.

Join WhatsApp Group

 

त्यामुळे 2022 हे वर्ष अभिनय विश्वासाठी धोकादायक म्हटले जात आहे. मागील दोन वर्षात गायन विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. यात लता मंगेशकर, बप्पी लहरी, केके, सिद्धू मुसेवाला या सारख्या दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे.

 

त्यामुळे गायन क्षेत्राला न भरणारी पोकळी पडली आहे. अशीच अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका प्रसिध्द 34 वर्षीय अभिनेत्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. त्यामुळे साऊथ चित्रपट सृष्टीला मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

 

साऊथ मधील प्रसिध्द अभिनेता लोकेश राजेंद्रन हे नाव तुम्ही ऐकलं असेल. मालिका विश्वात पाऊल ठेऊन या अभिनेत्याने सिने जगतावर राज्य केलं होत. करोडो रसिकांच्या मनावर राज्य केलं, आणि आज तो आपल्या सर्वांना सोडून गेला आहे. त्याने आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवले आहे.

 

गेल्या काही दिवसांपूर्वी त्याच्या प्तनीचे आणि त्याचे भांडण झाले होते. आणि ते दोघेही एकमेकांपासून लांब राहत होते. त्यांची पत्नी त्याच्याकडे घटस्फोटाची मागणी करत होती. मागील 4 दिवसापूर्वी त्यांच्या पत्नीने घटस्फोट घेण्यासाठी एक नोटीस पाठवली होती.

 

त्यात अभिनेता डिप्रेशन मध्ये गेला होता. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अभिनेता गेल्या काही दिवसांपासून अत्यंत दारूच्या आहारी गेला होता. तो अनेकवेळा पडलेल्या अवस्थेत दिसला. त्याने 105 मालिकांमध्ये आणि 15 चित्रपटात काम करून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

 

त्याच्या निधनाच्या बातमीने साऊथ सोबत पूर्ण बॉलिवूड वर शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गज लोकांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. चात्यांमध्ये देखील शोक व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. नेमके आत्महत्येचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button