आत्ताच्या घडामोडी

साऊथ चित्रपटसृष्टी हादरली! प्रभासच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन; अनेक चित्रपटांमध्ये साकारली होती भूमिका

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील दिग्गज कलाकार आपल्याला सोडून जात आहेत. त्यामुळे अभिनय क्षेत्राला कोणाची नजर तर लागली नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या आणखी एका दिग्गज अभिनेत्याच्या निधनाने साऊथ चित्रपट सृष्टी हादरली आहे.

 

गेल्या काही दिवसांपूर्वी पुनीत राजकुमार यांचं निधन झाले होते. त्यांच्या निधनाने तर पूर्ण देशात शोक व्यक्त केला जात होता. त्यांनी २००हून अधिक चित्रपटात भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. मात्र व्यायाम करत असताना त्यांचे अचानक निधन झाले.

 

त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मात्र पुनीत राजकुमार यांच्या नंतर आणखी एका साऊथ कलाकाराचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे प्रभास यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्राला झालंय तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 

कृष्णन राजू यांची प्राणज्योत मावळली आहे. ते प्रभास यांचे काका होते. त्यांनी देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. ते एक प्रसिध्द अभिनेते म्हणून ओळखले जायचे. त्यांचा चाहता वर्ग देखील वेगळा होता. मात्र त्यांच्या अचानक निधनाने शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button