साऊथ चित्रपटसृष्टी पुन्हा हादरली! 100हून अधिक चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्याचे निधन

दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार या जगाचा निरोप घेत आहेत. कलाकारांच्या निधनाने अभिनय क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण होऊ लागली आहे. २०२१ पासून अनेक दिग्गज कलाकारांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. यात अनेक दिग्गज कलाकारांचां समावेश आहे.
तसेच संगीत विश्वात सुद्धा शोक व्यक्त केला जात आहे. संगीत विश्वातील अनेक दिग्गजांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यात लता मंगेशकर, बप्पी लहरी तसेच केके यांच्या सारख्या अनेक दिग्गज कलाकारांचां समावेश आहे. सिद्धू मुसेवालाला तर गोळ्या झाडून मारण्यात आले आहे.
आत्ता नुकतीच साऊथ चित्रपट सृष्टीतील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका प्रसिध्द अभिनेत्याच्या निधनाने साऊथ चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. १०० हून अधिक चित्रपटात सदर अभिनेत्याने भूमिका साकारली होती. तसेच अनेक मोठ्या पुरस्कारांवर त्याने नाव कोरल होते.
त्यांचे नाव के विश्वनाथ असे होते. ते एक उत्तम दिग्दर्शक म्हणून देखील ओळखले जायचे. त्यांना १० फिल्मफेअर आणि तसेच भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन देखील गौरविण्यात आले होते. त्याच बरोबर त्यांना 8 राज्य नंदी हा पुरस्कार देखील देण्यात आला होता.
त्यांनी अनेक चित्रपटांसाठी दिग्दर्शन केले आहे. खेड्यातील अनेक तरुणांना आणि अभिनय क्षेत्रातील आवड असलेल्या लोकांना एक ट्रॅक तयार करून त्यांना प्रकाश झोतात आणायचे काम विश्वनाथ यांनी केलं आहे. त्यांच्या निधनाने पूर्ण चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक दिग्गज लोकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.