साउथ चित्रपटसृष्टी हादरली! अभिनेता महेश बाबूचे वडील रुग्णालयात दाखल; हृदयविकाराचां झटका…

हैदराबाद | गेली अनेक वर्षे दक्षिणात्य असो किंवा बॉलिवूड असो इतरही अनेक कलाकारांच्या अपघाताच्या निधनाच्या तसेच आजारपणाच्या वार्ता येत आहेत. काही दिवसांपूर्वी महेश बाबूच्या वडिलांची तब्येत चिंताग्रस्त होती अशी माहिती अनेक वृत्तसंस्थानी दिली आहे. आता पुन्हा एकदा महेश बाबूच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल करण्याचे कारण काय आहे हे नेमकं अजून पुढं आलं नाही.

Join WhatsApp Group

 

हैदराबादमधील काँटिनेंटल रुग्णालयात महेश बाबुचे वडील अभिनेते कृष्णा यांना 13 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कुणी म्हणतंय की त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होतोय, तर कुणी म्हणतंय की हृदयविकाराचा झटका आला आहे असे म्हणत आहे. कृष्णा यांचे जनसंपर्क अधिकारी कोंडा यांनी ट्विट करून काळजी करू नका अस आवाहन केलं आहे.

 

काही दिवसांपासून कृष्णा हे चित्रपट क्षेत्रातून दूरच आहेत. त्यांची काही वर्षांपूर्वी पहिली बायको इंदिरा देवी यांचं निधन झालं. तसेच 2019 मध्ये देखील दुसरी पत्नी विजय निर्मला यांचं निधन झालं आहे. तेव्हापासून त्यांनी या क्षेत्राला पाठ फिरवली आहे. कृष्णा यांचा मोठा मुलगा रमेश बाबू यांचे देखील निधन झाले आहे. 8 जानेवारीला त्यांचं आजारानं निधन झालं. 79 वर्षांचे कृष्णा हे दिग्दर्शक, जेष्ठ अभिनेते, निर्माते आणि 2009 साली पद्मभूषण पुरस्करणं त्यांना नावाजल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button