आत्ताच्या घडामोडीमनोरंजन

साऊथ सिनेसृष्टी हादरली! प्रसिध्द अभिनेत्रीचे निधन; 26व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

मुंबई | साऊथ अभिनेत्री शेरीन सेलीन मॅथ्यूचे मंगळवारी निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील कोची भागात राहणारी 26 वर्षीय ट्रान्सवुमन मॉडेल तिच्या भाड्याच्या घरामध्ये मृतावस्थेत आढळून आली.

 

तिने आत्यमहात्या केली तेव्हा ती तिच्या एका मैत्रिणी बरोबर व्हिडिओ कॉलवर बोलत होती. त्यावेळी तिच्या मैत्रिणीला या विषयी अंदाज येताच तिने पोलिसांना फोन केला. पोलिस देखील तातडीने तिकडे निघाले मात्र तो पर्यंत बराच उशीर झाला होता. तिने घळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले होते.

 

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शेरीनच्या जवळच्या लोकांनी माहिती दिली की, अभिनेत्रीला नैराश्याने ग्रासले होते आणि गेल्या काही दिवसांपासून ती नैराश्यात होती. या घटनेसंदर्भात पोलीस शेरीनच्या जवळच्या मित्रांचे जबाब नोंदवत आहेत. तिचा मृत्यू १६ मे २०२२ रोजी झाला. शेरीनने काही मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आणि मॉडेलिंगमध्ये सक्रिय होती. तसेच ती एक ट्रान्सजेंडर होती. कोचीमध्ये गेल्या वर्षभरात ट्रान्सजेंडरने केलेल्या आत्महत्येची ही पाचवी घटना आहे.

 

सध्या बंगाली अभिनेत्री पल्लवी डे हिच्या आत्महत्येने इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. टीव्ही शो ‘मोन माने ना’ मध्ये मुख्य भूमिकेत असलेली ही अभिनेत्री रविवारी कोलकाता येथील तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. अभिनेत्रीच्या आकस्मिक आणि अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. आणि ताज्या अपडेटनुसार, पल्लवी डेचा लिव्ह-इन पार्टनर साग्निक चक्रवर्ती याला अभिनेत्रीच्या केसशी संबंध असल्याबद्दल मंगळवारी अटक करण्यात आली.

 

तिच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी साग्निकला कोलकाता पोलिसांनी अटक केली होती. प्राथमिक पोस्टमार्टम अहवालाच्या आधारे या अभिनेत्रीचा मृत्यू आत्महत्येने झाल्याचे दिसते परंतु अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या संशयाच्या आधारे आणि चक्रवर्ती विरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button