प्रेग्नेंट राहिल्यानंतर तीन महिन्यांच्या आत सोनम कपूर झाली आई?

मुंबई | बॉलीवूड चित्रपटसृष्टीमधली अभिनेत्री सोनम कपूर ही तिच्या प्रेग्नेंसीमुळे सध्या मोठ्या चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसी विषयी सतत वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून तिने बाळाला जन्म दिला असल्याचे म्हटलं जात आहे. अशात या सर्वांमध्ये आता एक मोठा खुलासा करणारा फोटो समोर आला आहे.

Join WhatsApp Group

 

या फोटोमध्ये अभिनेत्री सोनम कपूर बेडवर झोपलेली दिसत आहे. तसेच तिच्या कुशीत एक नवजात बाळ देखील आहे. आपल्या बाळाबरोबर सोनम खूप आनंदी दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर आई झाल्याचा आनंद उफाळून आलाय. अशात हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सोनमचे सर्व चाहते ती आई झाल्यामुळे खूप खुश आहेत.

 

अनेक व्यक्ती सोशल मीडिया मार्फत तिला यासाठी शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्रीने आनंद अहुजा बरोबर विवाह केला. त्यानंतर मे महिन्यामध्ये तिने आपल्या पतीबरोबर काही फोटो शेअर करत ती आई होणार असल्याची माहिती सर्वांना दिली. तिच्याकडे असलेले गुड न्यूज ऐकून कपूर कुटुंबीय फार खुश झाले.

 

मात्र ती प्रेग्नेंट होऊन आता फक्त तीनच महिने झाले आहेत. मग तरी देखील तिने बाळाला जन्म कसा काय दिला? असा सर्वजण विचार करत आहेत. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आल आहे. अशात अभिनेत्रीने आता या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तिने सांगितले आहे की, ” मी अजूनही प्रेग्नेंट आहे मी अजून बाळाला जन्म दिलेला नाही.”

 

अभिनेत्रीच्या या वक्तव्यानंतर अनेक चाहते मोठ्या प्रश्नात पडलेले आहेत. कारण समोर आलेल्या फोटोमध्ये सोनम तिच्या बाळा बरोबर मस्त हसताना दिसत आहे. तर आता अशी माहिती समोर आली आहे की, हा फोटो सोनमचा नसून दुसऱ्या एका महिलेचा आहे. एका व्यक्तीने यामध्ये सोनमचे तोंड एडिट केलेले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये ही गल्लत झाली.

 

अभिनेत्री सोनम कपूरने आजवर बॉलीवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. लवकरच ती ब्लाइंड या चित्रपटामध्ये देखील झळकणार आहे. अभिनेत्रीने पॅडमॅन या चित्रपटांमध्ये अक्षय कुमार बरोबर काम केले. या चित्रपटात तिची भूमिका खूप थोडी होती. मात्र या छोट्या भूमिकेमधून देखील तिने मोठी प्रसिद्धी मिळवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button