आत्ताच्या घडामोडी

सोनाली कुलकर्णीने दुसऱ्यांदा केले लग्न; लंडनमधील फोटो व्हायरल

मुंबई | मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांनी गेल्या वर्षी कोणालाही न सांगता लग्न केले होते. त्याकाळी कोरोना असल्यामुळे त्यांनी या लग्नाचे कोणालाही निमंत्रण दिले नव्हते.

 

मात्र यावेळी पुन्हा तिने लग्न केले आहे. हे लग्न तिने लंडन मधील एका लग्न पॅलेस मध्ये केले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ख्रिश्चन पध्द्तीने हे लग्न केल्याचं देखील समजत आहे. सोनालीने अनेक चित्रपटात काम करून लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

 

त्यामुळे तिच्या आत्ताच्या लग्नाचे फोटो पाहण्याची अनेकांची उत्सुकता होते. मात्र तिने अद्याप कोणतेही फोटो शेअर केले नाहीत, पण तिच्या फोटो ग्राफर ने एक फोटो शेअर केला आहे. तो सध्या तुफान व्हायरल होत असताना दिसत आहे.

 

यात तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केल्याचं दिसत तर तिच्या पतीने म्हणजेच कुणाल ने काळया रंगाचा कोट परिधान केल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांकडून हा फोटो व्हायरल केलाजात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button