कधी चालवली रिक्षा तर कधी गायली बर्थडे पार्टीत कविता; राजू श्रीवास्तव यांची स्ट्रगल स्टोरी वाचून डोळ्यात पाणी येईल

मुंबई | राजू श्रीवास्तव यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आयुष्यभर दुसऱ्यांना हासवणाऱ्या राजू यांनी अखेर पूर्ण भारत देशातील अनेकांना रडवल आहे. गेल्या काही दिवसांपासून ते मृत्यू सोबत झुंज देत होते.
अखेर त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने एका काळाचा अंत झाला आहे. ते एक प्रसिध्द विनोदी कलाकार म्हणून ओळखले जायचे. निधनाच्या वेळी त्यांचं वय ५८ वर्ष होत. त्यांच्या निधनाने अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
राजू श्रीवास्तव हे नाव फिल्म इंडस्ट्रीत जरी मोठ असले तरी याच्या मागे त्यांचा खूप मोठा स्ट्रगल आहे. त्यांनी केलेलं कष्ट पाहून कदाचित तुमच्या डोळ्यात देखील पाणी येईल. राजू श्रीवास्तव यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव हे एक गायक होते. त्यांच्या कडून प्रेरणा घेऊन त्यांनी बर्थडे पार्टीत कविता गायली.
१९८२ साली ते मुंबई मध्ये आले, मुंबई मध्ये आल्यावर पैसे कमवून उपजीविका भागावन हे महत्वाचं होत. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला मुंबईत रिक्षा चालवली, आणि त्यानंतर हळूहळू छोटया कार्यक्रमात काम करायला सुरुवात केली. आणि बॉलिवूड मध्ये पाऊल टाकले.
त्यांनी बॉलिवूड मध्ये आल्यानंतर द ग्रेट इंडियन लाफ्टर या चित्रपटाने त्यांना खरं प्रकाश झोतात आणले, तसेच त्यांनी सुरुवातीला मैने प्यार किया या चित्रपटात देखील भूमिका साकारली होती.