आत्ताच्या घडामोडी

सलमान खानच्या भावाचा संसार मोडला; सोहेल – सीमा होणार विभक्त

दिल्ली | सोहेल खान आणि सीमा खान यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. बॉलिवुड मधील ही आत्ताची सर्वात मोठी बातमी मानली जातं आहे. गेल्या काही दिवसापासून ते दोघे वेग वेगळे राहत आहेत.

 

यातच आता त्यांनी एकमेकांना सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. ते दोघे कौटुंबिक कोर्टामध्ये आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

 

त्यामुळे बॉलिवूड क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सोहेल हा बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा भाऊ आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोहेल आणि सीमा या दोघात काहीतरी बिनसलं होत. त्यामुळे ते वेग वेगळे राहत होते.

 

या दोघांना दोन मुलं देखील आहेत. सीमा ही एक फॅशन डिझायनर आहे. तर सोहेल हा एक प्रसिध्द अभिनेता आहे. तसेच त्याने काही चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे. लवकरच ते एकमेकांना सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button