सोशल मीडिया मार्गदर्शन व्याख्यान संपन्न; सोशल मीडिया तज्ञ निलेश चव्हाणकेंची प्रमुख उपस्थिती

ताथवडे | ताथवडे येथील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचालित राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सोशल मीडिया तज्ञ निलेश चव्हाणके यांचे ‘सोशल मीडिया मधील करिअरच्या संधी’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

या व्याख्यानामध्ये निलेश यांनी दैनंदिन जीवनातील वापरात येणाऱ्या सोशल मीडियाची योग्य ती ओळख करून दिली. आजच्या काळात मोबाईलमुळे भरकटलेल्या तरूण वर्गाला सोशल मीडियाचा योग्य वापर कसा करावा आणि त्याद्वारे फायदा कसा करून घेता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच सोशल मीडियामुळे होणारे फायदे व त्याद्वारे उपलब्ध होणाऱ्या सुविधा आणि भविष्यातील करिअरच्या संधी अशा अनेक बाबी त्यांनी स्पष्ट केल्या.

प्राध्यापक डॉ. प्रशांत कुंभारकर तसेच प्राध्यापक अविनाश गोलांडे कार्यक्रमास उपस्थित होते व त्यांनीदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यिन पिंपरी चिंचवड व ग्रामीणचे समन्वयक अक्षय बर्गे, यिन पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष तथा महाविद्यालयीन अध्यक्ष विक्रम खाडे, महाविद्यालयीन उपाध्यक्ष आकाश जाधव, कोअर टीम सदस्य धृव कठाळे व पियूष इंगोले कार्यक्रमास उपस्थित होते.

Advertisement

याच बरोबर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अविनाश गोलांडे तसेच यिन फोरममधील विद्यार्थी दिया साळुंखे, मृणाल शास्त्रकार, ओम सोनवणे व महाविद्यालयीन यिन कोअर टीमने विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्राध्यापक डॉ. प्रशांत कुंभारकर यांनी केले व दिया साळुंखे या विद्यार्थीनीने सूत्रसंचालन केले. प्राध्यापक अविनाश गोलांडे यांनी आभार मानले.

Advertisement

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *