सिंघम चित्रपटातील शिवाची पत्नी दिसते खूप सुंदर; करते हे काम

मुंबई | बॉलिवूडचा सिंघम हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटात अजय देवगण प्रमाणे इतर कलाकारांच्या भूमिका देखील दमदार होत्या. त्यातीलच एक शिवा. या शिवाने देखील चित्रपटात एक वेगळीच रंगत आणली. सिंगचा शिवा म्हणजे अभिनेता अशोक समर्थ. त्याने या चित्रपटात जीव ओतून काम केले. त्यामुळे त्याच्या अभिनयाचे सगळीकडे कौतुक झाले. अशात आज या बातमीतून अशोक समर्थ आणि त्याच्या पत्नी विषयी जाणून घेऊ.
अशोक समर्थ हा मूळचा बारामती येथील आहे. लहानपणापासून तो आखाड्यांमध्ये खेळ खेळत होता. कुस्ती त्याला खूप आवडायची त्यामुळेच आजही तो पहिलवाना सारखा दिसतो. पिळदार शरीरयष्टी असलेल्या या अभिनेत्याने मराठी मालिका आणि चित्रपट सृष्टी देखील खूप गाजवली आहे. लक्ष ही मालिका तुम्हाला आठवतच असेल. यामध्ये त्याने अभय कीर्तीकर ही भूमिका साकारली होती.
शालेय शिक्षण घेत असताना पासूनच तो एकांकिकांमध्ये काम करत होता. हळूहळू त्याच्यामध्ये अभिनयाची गोडी निर्माण झाली. त्यानंतर पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी याच क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. माझिया प्रियाला प्रित कळेना ही त्याची पहिली मालिका होती. त्यानंतर त्याने लक्ष या मालिकेमध्ये काम केले. लक्ष ही मालिका तब्बल पाच वर्षे चालली. याच मालिकेने त्याला घराघरात पोहोचवले.
त्यानंतर अभिनयाच्या कारकिर्दीत त्यानी बॉलीवूडमध्ये देखील नशीबआजमावलं. आणि इनसान या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर रोहित शेट्टीच्या सिंघम चित्रपटामध्ये तो झळकला. सिंघममुळे त्याच्या प्रसिद्धीत आणि चाहत्या वर्गात भर पडली. या चित्रपटामध्ये त्याने साकारलेल्या शिवा अनेकांना भावला. चित्रपटातील त्याच्या खलनायकाच्या भूमिकेचे सर्वांनी भरभरून कौतुक केले.
अशात त्याची पत्नी देखील अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. त्याच्या पत्नीचे नाव शितल पाठक असे आहे. ट्राफिक जाम या चित्रपटाच्या शूटिंग वेळी या दोघांची भेट झाली होती. पहिल्याच भेटीत अशोक समर्थ शितलच्या प्रेमात पडला. सुरुवातीला त्याने शितल बरोबर मैत्री केली आणि त्यानंतर आपल्या प्रेमाची कबुली दिली.
21 फेब्रुवारी 2021 रोजी या दोघांनी लग्न गाठ बांधली. या दोघांच्या विवाह सोहळ्याला अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते. मंडळी तुमच्यासाठी काय पण, माझं गाव तंटामुक्त, चेहरा, तात्या विंचू लगे रहो, सामर्थ्य, बायगो बाय या चित्रपटांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली आहे.
तिने मिलिंद गवळी यांच्याबरोबर देखील अभिनय केला आहे. कृपासिंधू या चित्रपटांमधून ती नावारूपाला आली. शितल सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती दिसायला देखील कमालीची सुंदर आहे. अशात लवकरच हे जोडपं दिग्दर्शन क्षेत्रामध्ये देखील नशीब आजमावणार आहे.