आत्ताच्या घडामोडी

प्रसिध्द गायक भूपिंदर सिंह यांचे निधन; मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई | प्रसिध्द गायक भुपिंदर सिंह यांनी जगाचा निरोप घेतला आहे. मुंबई मधील एका रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामूळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

मात्र दिवसेंदिवस त्यांच्या प्रकृतीत बिघाड होत गेला. आणि यात त्यांची प्राणज्योत मावळली आहे. भूपिंदर सिंह हे प्रसिध्द गायक आणि पीटी वाजक होते. त्यांनी अनेक गाणी गाऊन करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

 

त्यांना मूत्र संधर्भात काही आजार झाला होता. त्यामुळे ते या आजाराशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली आहे. आणि अखेर त्यांची प्राणज्योत मावळली आहे. अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

त्यांच्या मृत्यू बाबत त्यांच्या पत्नी मीथाली यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे पूर्ण देशात शोक व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या जाण्याने कला विश्वास मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button