सिद्धू मुसेवला हत्या प्रकरणात त्याच्याच बहिणीची पाच तास चौकशी…

पंजाब| प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात गायिका अफसाना हीची देखील चौकशी केली जातेय. अफसाना ही सिद्धूची गुरू बहीण होती. नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सीने (NIA) गँगस्टर टररिस्ट सिंडिकेट प्रकरणात समन्स बजावला.
सिद्धूच्या हत्येप्रकरणी मध्यंतरीच्या काळात छापे टाकण्यात आले, तेव्हापासून अफसाना ही एनआयएच्या रडारवर आहे. संशयामुळेच केंद्रीय तपास संस्थेने अफसानाला चौकशीसाठी बोलावलं. वैयक्तिक शत्रुत्वामुळे सिद्धूची हत्या झाली होती. त्यामुळे तो नेमका कशामुळे लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर होता, याविषयी अफसानाला विचारण्यात आलं.
एनआयएला असाही संशय आहे की सिद्धूच्या हत्याप्रकरणात अफसानाचाही हात असू शकतो. बंबिहा गँग आणि अफसाना यांच्या कनेक्शनचा संशय एनआयएला आहे. बंबिहा आणि लॉरेन्स बिश्नोई गँग हे एकमेकांचे कट्टर वैरी आहेत. सिद्धूच्या हत्येचा आरोप लॉरेन्स बिश्नोईच्या गँगवर करण्यात आला. सिद्धूची बंबिहा गँगशी जवळीक होती, असा संशय बिश्नोई गँगला होता. या गँगस्टर्सचं नेटवर्क उघड करण्यासाठी एनआयएने दोन छापे टाकले होते.
अफसाना बद्दल चौकशी करण्यासाठी मनसा पोलिसांनी नोटीस बजावली. 28 वर्षीय सिद्धू मूसेवालाची 29 मे रोजी गोळ्या झाडून हत्या झाली होती. मारेकऱ्यांनी सिद्धुवर 30 राऊंड फायरिंग केली होती.