अवघ्या १७व्या वर्षी श्रद्धाने स्वतःला संपवलं, वाचून डोळ्यात पाणी येईल

मुंबई | मागील काही दिवसापासून अल्पवयीन मुला मुलींचे आत्महत्या होताना फार मोठे प्रमाणात वाढले आहे. या तरुण मुला मुलींचे आत्महत्येचे कारण अगदी छोटे छोटे कारणे ठरत आहेत. या लहान मुला मुलींच्या आत्महत्या करण्याची काय कारणे आहेत याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
असाच एक प्रकार अल्पवयीन मुलीने ओढणीच्या साह्याने गळफास लावून झरी तालुक्यातील पठारपुर या ठिकाणी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्या केल्याचा प्रकार हा गुरुवारी दुपारी अडीच वाजता च्या दरम्यान उघडकीस आला. ओढणीने गडपसर आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव श्रद्धा पेचे वय सतरा वर्षे असे आहे. या घटने विषयी माहिती जगदीश रामकृष्ण नांदेकर यांनी मुकुटबन पोलीस स्टेशन या ठिकाणी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान धनराज पेचे यांची मुलगी श्रद्धा हिने राहत्या घरामध्ये सिलिंग फॅन अँगल ला ओडणीच्या साह्याने गळफास घेतल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. गुरुवारी धनराज पेचे हे बाजार करण्यासाठी कायर याठिकाणी गेले होते. गावकऱ्यांनी त्यांना या घटने विषयी माहिती सांगत असते त्वरित घरी आले.
श्रद्धा ही महाविद्यालयाचे शिक्षण घेत असताना तिने आत्महत्या का केली याचे कारण अजून कोणालाही समजले नाही. श्रद्धा च्या आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पंचनामा मुकुटबन येथील पोलीस टीमने केला असून घटनेचा तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती देऊ असे पोलिसांनी सांगितले.