शोले मधील गब्बर सिंगची मुलगी दिसते खूप सुंदर; करते हे काम

मुंबई | शोले हा चित्रपट म्हटला की, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र म्हणजे जय आणि विरू यांच्या आधी डाकू गब्बर सिंग आठवतो. या गब्बर सिंगने त्या काळी चांगलाच धुमाकूळ घातला. गब्बर सिंग ही भूमिका अभिनेते अजमद खान यांनी साकारली होती.

 

त्यांचा कारकिर्दीत हा चित्रपट त्यांच्या अभिनयाच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. यामुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. त्यांची डायलॉग फेकण्याची शैली एवढी प्रभावी होती की, आजही “सो जा बच्चा नही तो डाकू गब्बर सिंग आ जायेगा…” हा डायलॉग अनेक व्यक्ती बोलताना दिसतात.

 

शोलेच्या यशानंतर त्यांनी 1970, 1980 आणि 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका करणे सुरूच ठेवले – लोकप्रियता आणि मागणीच्या संदर्भात अभिनेते अजित आणि अमिताभ बच्चन यांच्या विरुद्ध नायक म्हणून त्यांनी अनेकदा खलनायकाच्या भूमिका केल्या. इंकारमधली त्यांची भूमिकाही भयानक पद्धतीने मांडण्यात आली होती. देस परदेस , नास्तिक , सत्ता पे सत्ता , चंबल की कसम , गंगा की सौगंध , हम किसीसे कम नहीं आणि नसीब या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार अभिनय केला.

 

1972 मध्ये, त्यांनी शैला खानशी लग्न केले आणि पुढील वर्षी, त्यांच्या पहिल्या मुलाला, शादाब खानला जन्म दिला . त्यांना एक मुलगी आहे तिचं नाव अहलम खान आहे. तसेच आणखीन दुसरा एक मुलगा आहे. त्याचं नाव सीमाब खान आहे. मुलगी अहलमने 2011 मध्ये लोकप्रिय थिएटर अभिनेता जफर कराचीवाला यांच्याशी विवाह केला. तो पारशी झोरोस्ट्रियन आहे.

 

अहलम सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती देखील अभिनय क्षेत्रात नशीब आजमावत आहे. आता पर्यंत तिने एक चित्रपट आणि काही नाटकांमध्ये अभिनय केला आहे. ती दिसायला खूप सुंदर असल्याने अनेक जण तिच्या सुंदरतेचे नेहमी कौतुक करत असतात.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button